मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल... कुठून कुठपर्यंत असेल रूट? बीएमसीची नवी अपडेट

मुंबई तक

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वांद्रे-धारावी उड्डाणपुलाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे.

ADVERTISEMENT

मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल...
मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल...

point

काय आहे बीएमसीची नवी अपडेट?

Mumbai News: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वांद्रे-धारावी उड्डाणपुलाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. या पहिल्या टप्प्यात दोन महिन्यांनंतर पुलाचे दोन लेन उघडले जातील आणि माहीम कॉजवेकडे फ्लायओव्हरवर थेट प्रवेश उपलब्ध होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. याशिवाय, डिसेंबर 2025 पर्यंत वांद्र्याहून म्हाडा स्कायवॉक सुरू करण्याचं लक्ष्य महापालिकेनं ठेवलं आहे.


 

महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत पूल आणि स्कायवॉक बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये वांद्रे ते धारावी उड्डाणपूल, वरळीतील ई मोझेस मार्ग आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गादरम्यानच्या नाल्यावर बांधण्यात येणारा उड्डाणपूल तसेच वांद्रे येथील स्कायवॉकचे काम यांचा समावेश होता. या कामांची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी केली. मिठी नदीच्या पात्राच्या रुंदीकरण प्रोजेक्टचा एक भाग म्हणून, वांद्रे ते धारावी पर्यंत या पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. नदीच्या मुखाचं रुंदीकरण केले जात असून दाब कमी करण्यासाठी धारावी उड्डाणपूलाची दोन टप्प्यात पुनर्बांधणी केला जात आहे. 

 

हे ही वाचा: Govt Job: 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सैन्यात भरती होण्याची नवी संधी... काय आहे अर्जाची शेवटची तारीख?


 

फ्लायओव्हरचा पहिला टप्पा 90 टक्के पूर्ण झाला असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दक्षिणेकडे जाणारे दोन लेन उघडले जाणार असून यामुळे माहीम कॉजवेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर थेट प्रवेश मिळेल. तसेच, दुसऱ्या पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येतील. 18 महिन्यांत उड्डाणपूलाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं बांगर यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp