Govt Job: 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सैन्यात भरती होण्याची नवी संधी... काय आहे अर्जाची शेवटची तारीख?
bsf head constable vacancy 2025, bsf head constable ro rm eligibility, bsf head constable age limit, bsf head constable vacancy 2025 las date, bsf recruitment 2025 online apply, Govt Job
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

10 वी, 12 वी पास तरुणांसाठी सैन्यात भरती होण्याची नवी संधी...

काय आहे अर्जाची शेवटची तारीख?
Govt Job: सैन्यात नोकरी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) कडून 11000 हून अधिक हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर (RO) आणि रेडिओ मेकॅनिक (RM) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 23 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. जर तुम्ही अद्याप या भरतीसाठी अर्ज केला नसेल, तर BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
BSF च्या या भरतीमध्ये रेडिओ ऑपरेटर हेड कॉन्स्टेबलच्या 910 रिक्त जागा आणि रेडिओ मेकॅनिक हेड कॉन्स्टेबलच्या 211 रिक्त जागा भरल्या जातील. यापैकी 280 पदे विभागीय म्हणजेच डिपार्टमेंटल उमेदवारांसाठी देखील आहेत. या भरतीसाठी उमेदवार 23 सप्टेंबर या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत.
या बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भरतीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांत किमान 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, 2 वर्षांचा आयटीआय डिप्लोमा केलेले 10 वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असतील.