Govt Job: इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सैन्यात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महासंचालनालयाकडून ग्रुप सी अंतर्गत एलडीसी, फायरमन, स्टोअरकीपर, मशिनिस्ट, कुक, वेल्डर यासारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑफलाइन अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टने निर्धारित पत्त्यावर पाठवू शकतात.
ADVERTISEMENT
वयोमर्यादा आणि पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित पदांनुसार पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी १०वी/मॅट्रिक्युलेशन/आयटीआय/१२वी उत्तीर्ण असण्यासोबतच त्यांच्याकडे पदानुसार संबंधित क्षेत्रात आयटीआय/बी.एससी इत्यादी डिग्री असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि किमाल 25 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: मुंबईतील वृद्ध नागरिकाला 70 लाख रुपयांना गंडा... भामट्यांनी सरकारी अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगितली अन्...
‘या’ पदांसाठी निघाली भरती
-
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 2 पदे
-
फायरमन: 1 पद
-
वेहिकल मैकेनिक (Armed Fighting Vehicle), Highly Skilled-II: 04 पदे
-
फिटर (स्किल्ड): 3 पदे
-
वेल्डर (स्किल्ड): 3 पदे
-
ट्रेड्समन मेट: 8 पदे
-
वॉशरमन: 2 पदे
-
कुक: 1 पदे
-
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 3 पदे
-
इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II): 2 पदे
-
टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II): 07 पदे
-
Upholster (Skilled): 01 पद
-
फायरमन: 3 पदे
-
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 2 पदे
-
स्टोरकीपर: 3 पदे
-
इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II): 02 पदे
-
Upholster (Skilled): 02 पदे
-
मशीनिष्ट (स्किल्ड): 4 पदे
-
वेल्डर (स्किल्ड): 1 पदे
-
Tin and Copper Smith (Skilled): 01 पद
-
ट्रेड्समन मेट: 17 पदे
-
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): 7 पदे
-
स्टोरकीपर: 4 पदे
-
इंजीनियर इक्विपमेंट मेकॅनिक: 1 पद
-
हे ही वाचा: सरकारी नोकरी जाण्याची भिती, तीन दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात सोडलं अन् दगडाखाली... नेमकं काय कारण?
काय आहे निवड प्रक्रिया?
या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी, उमेदवारांना आधी लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना नंतर ट्रेड टेस्ट/कौशल्य चाचणीमध्ये सहभागी व्हावं लागेल. त्यानंतर, सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचा अंतिम मेरिट लिस्टमध्ये समावेश केला जाईल. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होण्यासाठी उमेदवारांनी मेडिकली फिट म्हणजेच आरोग्याच्या वैद्यकीय दृष्ट्या तंदुरूस्त असणं अनिवार्य आहे. भरतीबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार एम्प्लॉयमेंट न्यूज (4-10 ऑक्टोबर, 2025) मध्ये प्रकाशित झालेलं नोटिफिकेशन वाचू शकतात.
ADVERTISEMENT
