Govt Job: 'या' तरुणांना भारतीय सैन्यात थेट भरती होण्याची संधी! केवळ मुलाखत अन्... काय आहे पात्रता?

भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES)-55 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय सैन्यात थेट भरती होण्याची संधी!

भारतीय सैन्यात थेट भरती होण्याची संधी!

मुंबई तक

• 01:06 PM • 08 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' तरुणांना भारतीय सैन्यात थेट भरती होण्याची संधी!

point

केवळ मुलाखत अन्... काय आहे पात्रता?

Indian Army Recruitment 2025: कोणत्याही परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात सहभागी होण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES)-55 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या या कोर्ससाठी 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. आता या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच, उमेदवार 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत www.joinindianarmy.nic.in या इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या एन्ट्रीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून फीजिक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि मॅथेमेटिक्स (गणित) या विषयांत किमान 60 गुणांसह 12 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी JEE (Mains) परीक्षेत सहभागी होणं आवश्यक आहे. 

वयोमर्यादा 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं वय 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे दरम्यान असलं पाहिजे. 1 जुलै 2026 ही तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. 

ट्रेनिंगचा कालावधी: 4 वर्षे (3+1)
वेतन: ट्रेनिंग दरम्यान, 56100 रुपये आणि कमीशनिंग नंतर - 17 ते 18 लाख रुपये वर्षिक 

हे ही वाचा: मुंबई: तरुणीने कॅब बुकिंगसाठी डिटेल्स शेअर केले, पण काही दिवसांनंतर बरेच अश्लील कॉल्स अन् मॅसेजेस... नेमकं प्रकरण काय?

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये केवळ ऑनलाइन अर्ज स्विकारले जातील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.joinindianarmy.nic.in या अधिकृत       वेबसाइटवर जा. 
2. त्यानंतर, Online Application या बटणावर क्लिक करा. 
3. आता वैयक्तिक आणि शैक्षणिक पात्रतेसह सर्व आवश्यक माहिती भरा. 
4. माहिती भरल्यानंतर पासपोर्ट साइझ फोटो आणि सही स्कॅन करून पाठवा. 
5. अर्ज यशस्वीरित्या भरण्यासाठी उमेदवारांना डॉयलॉग बॉक्सच्या माध्यमातून याची पुष्टी करावी लागेल. 
6.ऑनलाइन अर्ज बंद झाल्याच्या 30 मिनिटांनंतर फॉर्म प्रिंटआउटसाठी उपलब्ध होईल. 

हे ही वाचा: "मम्मी, पप्पा मला माफ करा..." NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल!

एसएसबी मुलाखतीसाठी, उमेदवारांना अर्जाची प्रत सिलेक्शन सेंटरवर घेऊन जावी लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रे देखील सोबत ठेवावी लागतील.

    follow whatsapp