"मम्मी, पप्पा मला माफ करा..." NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल!
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्याने, आपल्या हॉस्टेलमधील खोलीत फाशी घेत स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल!
"मम्मी, पप्पा मला माफ करा..." म्हणत तरुणाची आत्महत्या...
Crime News: सध्या, लोक नैराश्यातून आपल्या जीवाची पर्वा न करता टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या बऱ्याच घटना घडत असतात. विशेषत: तरुणांमध्ये या गोष्टीचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळतात. अशीच NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्याने, आपल्या हॉस्टेलमधील खोलीत फाशी घेत स्वत:चं आयुष्य संपवल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील कानपुर येथे घडली. तरुणाच्या मृतदेहाजवळ 2 पानांची सुसाइड नोट सापडली.
रामपूरच्या भंवरका येथील रहिवासी असलेला 21 वर्षीय मोहम्मद आन नावाचा तरुण एका हॉस्टेलमध्ये राहून नीट परीक्षेची तयारी करत होता. त्याच्यासोबत इमदाद नावाचा तरुण सुद्धा हॉस्टेलच्या खोलीत राहत होता. शुक्रवारी (7 नोव्हेंबर) हसन दुपारी 12 वाजताच्या सुमारास खोलीच्या बाहेर गेला. तिथून हॉस्टेलमध्ये परत आल्यानंतर त्याला खोलीचा दरवाजा आतून बंद आढळला.
हे ही वाचा: मुंबई: तरुणीने कॅब बुकिंगसाठी डिटेल्स शेअर केले, पण काही दिवसांनंतर बरेच अश्लील कॉल्स अन् मॅसेजेस... नेमकं प्रकरण काय?
पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह
दरवाजा बंद असल्यामुळे हसनने त्याच्या रूममेटला बरेच कॉल केले. पण, मोहम्मदकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे, हसनला चिंता वाटू लागली आणि त्याने याबद्दल आसपासच्या लोकांना सांगितलं. त्यानंतर, मुलांनी वरच्या मजल्यावरील जाळीतून मोहम्मदच्या खोलीत डोकावलं आणि त्यांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आनचा मृतदेह आढळला. त्यानंतर, त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि पंख्याला लटकलेला मृतदेह खाली उतरवून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
हे ही वाचा: तीन मुलांच्या आईचे गावातील तरुणासोबत जुळले सूत! प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचं प्लॅनिंग अन् शेतात बोलवून...
सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं?
घटनास्थळावरून पोलिसांना दोन पानांची सुसाइड सापडली. पोलिसांनी ती सुसाइड नोट ताब्यात घेतली. त्यामध्ये लिहिलं होतं की, "मम्मी, पप्पा मला माफ करा. मी खूप नैराश्यात आहे कारण मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. मी माझं आयुष्य संपवतो आणि याला मीच जबाबदार आहे. मी गेल्यानंतर सुद्धा कुटुंबियांनी आनंदात राहा."










