तीन मुलांच्या आईचे गावातील तरुणासोबत जुळले सूत! प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचं प्लॅनिंग अन् शेतात बोलवून...
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन मुलांच्या आईचे गावातील तरुणासोबत जुळले सूत!
प्रियकरासोबत पतीच्या हत्येचं प्लॅनिंग अन्...
Crime News: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी महिला ही तीन मुलांची आई असून तिचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. महिलेच्या पतीला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्याने संबंधित महिलेने पतीची हत्या केल्याचं ठरवलं. गावाच्या बाहेर असलेल्या एका शेतात पीडित तरुणाचा मृतदेह आढळला. संबंधित व्यक्तीच्या शरीरात तीन गोळ्या लागल्याचं समोर आलं.
गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध
तपासादरम्यान, पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिलेचं नाव अंजली असून ती काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीच्या घरातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर, मृताच्या पत्नीचे त्याच गावात राहणाऱ्या अजय नावाच्या एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी अजयशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी तो सुद्धा त्याच्या घरी नव्हता. अखेर, अजय त्याच्या प्रेयसीसोबत म्हणजेच मृताच्या पत्नीसोबत लपून राहिल्याचं आढळलं. त्यानंतर, कठोर चौकशीदरम्यान, अजयने त्याचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा: बलात्कारामुळे प्रेग्नंट झालेल्या 15 वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पतीला अनैतिक संबंधाबद्दल कळालं अन् हत्येचं प्लॅनिंग...
अजयने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित राहुलला त्याच्या पत्नीच्या अजयसोबत असलेल्या अनैतिक संबंधाबद्दल कळालं होतं. यामुळे, अंजली घाबरली आणि तिने आपल्या पतीच्या हत्येची योजना आखली. हत्येच्या प्लॅनिंगनुसार, अजयने राहुलला गावाजवळून काही अंतरावर असलेल्या शेतात बोलवलं. पीडित राहुल अजयने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या तीन गोळ्या झाडण्यात आल्याचं तपासातून समोर आलं.
हे ही वाचा: जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
पतीचा निर्घृणपणे खून
लग्नानंतर, राहुल आणि अंजलीला तीन मुलं झाल्याची माहिती आहे. तसेच, त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू होता, असं देखील सांगितलं जात आहे. खरं तर, अंजलीला इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याची प्रचंड आवड होती. ती नेहमी तिच्या पतीसोबत रील्स बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करायची आणि यावर तिचे फोलोअर्स सुद्धा बऱ्याच कमेंट्स करायचे. दरम्यान, अंजलीचे त्याच गावातील एका तरुणासोबत सूत जुळले आणि ती तिच्या पतीपासून दूर झाली. त्यानंतर, अंजली अजयच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने आपल्या पतीची हत्या करण्याची योजना आखली आणि पतीचा निर्घृणपणे खून केला.










