Govt Job: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय तटरक्षक दलात सामील होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तटरक्षक दलाकडून असिस्टंट कमांडंट बॅच 2027 साठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 8 जुलै 2025 पासून या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
इंडियन कोस्ट गार्डची ही भरती जनरल ड्यूटी आणि टेक्निकल ब्रांचसाठी करण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर थेट लिंक उपलब्ध असल्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे.
काय आहे पात्रता?
जनरल ड्यूटी (GD) च्या पदासाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवाराकडे कोणत्याही विषयातून पदवी (Graduation) ची डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच टेक्निकल शाखेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरींगमध्ये डिग्री असणं आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील शेक्षणिक पात्रता भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून असायला हवी.
हे ही वाचा: 'गरोदर राहायचं होतं', मुंबईच्या नीतूने घेतली छांगुर बाबाची मदत अन् नवऱ्यासोबत मिळून... तरुणीची ही कहाणी सर्वांनाच चक्रावून टाकेल!
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 जुलै 2001 ते 30 जून 2005 दरम्यान झालेला असावा. जर यापूर्वी उमेदवाराकडे आर्मी, नौदल, हवाई दल किंवा तटरक्षक दलात सेवेचा अनुभव असल्यास उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येईल.
अर्जाचं शुल्क
जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 300 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवारांना अर्जाचं शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येईल.
हे ही वाचा: आधी चोर म्हणून मारहाण अन् दुसऱ्या दिवशी त्यालाच बनवलं जावई... एका रात्रीत नेमकं काय घडलं?
कसा कराल अर्ज?
1. सर्वप्रथम उमेदवारांनी joinindiancoastguard.cdac.in या वेबसाइटवर जा.
2. होमपेजवरील CGCAT 2027 Batch यावर क्लिक करा.
3. त्यानंतर 'News/Announcements' सेक्शनमध्ये जाऊन अर्जाची लिंक उघडा.
4. नवं अकाउंट तयार करण्यासाठी Registration करून आवश्यक माहिती भरून घ्या.
5. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करा आणि पूर्ण अर्ज भरा.
6. शेवटी अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
ADVERTISEMENT
