Govt Job: 10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी! ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... लवकर करा अप्लाय

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून तब्बल 405 अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

ना लेखी परीक्षा, ना मुलाखत...

ना लेखी परीक्षा, ना मुलाखत...

मुंबई तक

• 02:02 PM • 20 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी!

point

ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job: सरकारी कंपनीत कोणत्याही परीक्षेशिवाय नोकरी मिळवायची असेल, तर 10 वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून तब्बल 405 अप्रेन्टिसशिप पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. यासाठी उमेदवार 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

वयोमर्यादा 

IOCL अप्रेन्टिसच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे वयोमर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 

कशी होणार निवड? 

या भरतीसंदर्भातील विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टवरून अप्रेन्टिस पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल टेस्टसाठी बोलवण्यात येईल. याचाच अर्थ, कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. 

हे ही वाचा: वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातच मुलाची निर्घृण हत्या! थेट घरात घुसून गुंडांचा हल्ला अन्...

शैक्षणिक पात्रता 

टेक्निशिअन अप्रेन्टिस पदासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात 3 वर्षांच्या इंजीनिअरिंग डिप्लोमाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तसेच, ट्रेड अप्रेन्टिस पदांसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण आणि त्यासोबतच त्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. पदानुसार पात्रता निश्चित करण्यात आली असून विस्तृत माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात. 

ग्रॅज्युएट अप्रेन्टिस पदासाठी उमेदवाराचं कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तसेच, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण असण्यासोबत त्याच्याकडे संबंधित कौशल्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. टेक्निकल फील्डमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 

हे ही वाचा: मुंबई: कांदिवलीत धावत्या बसला भीषण आग, संपूर्ण परिसरात आगीचे लोट; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काय घडलं?

या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. म्हणजेच, जनरल (Open), ओबीसी (OBC), एसटी (ST) प्रवर्गातील आणि अपंग उमेदवार अगदी निशुल्क अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार iocl.com या IOCL अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

    follow whatsapp