IB Recruitment: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. आता कोणत्याही परीक्षेशिवाय गुप्तचर विभागात सहभागी होण्याची सुवर्णसंधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) कडून असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक (IB ACIO Tech) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड केवळ GATE स्कोअर, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
इंटेलिजेंस ब्युरो ही देशातील सर्वात महत्त्वाची गुप्तचर संस्था आहे. गुप्तचर विभागाची ही भरती ACIO ग्रेड-II/टेक पदांसाठी आहे, ज्यामध्ये एकूण 285 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे ग्रुप सी अंतर्गत येतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 25 ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून उमेदवार आज म्हणजेच 16 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
गुप्तचर विभागाच्या या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे टेक्निकल क्षेत्रात पदवी असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर सायन्स, कंप्यूटर इंजीनिअरिंग, आयटी तसेच संबंधित ब्रांचमध्ये बीई किंवा बी.टेक पदवी असेल तर उमेदवार भरतीसाठी पात्र ठरू शकतात. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर सायन्स, फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा कंप्यूटर अप्लिकेशनसह विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. उमेदवारांनी GATE 2023, 2024 किंवा 2025 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याच गुणांच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
हे ही वाचा: पुण्याची गोष्ट: 'इंद्रायणीचं पाणी पिण्यासह, स्वयंपाकासाठी...', जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश
वयोमर्यादा
इंटेलिजन्स ब्यूरोच्या या भरतीसाठी 18 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
किती मिळेल पगार?
या पदांवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना चांगलं वेतन मिळेल. लेव्हल-7 वेतनमानानुसार, भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इतर सरकारी भत्त्यांसह 44,900 ते 1,42,400 रुपये मासिक पगार मिळेल.
हे ही वाचा: लिंग बदलासाठी दबाव अन् शारीरिक छळ! कुत्र्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं... मुंबईतील तरुणासोबत काय घडलं?
कसा कराल अर्ज?
1. सर्वप्रथम, उमेदवारांना गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर वेबसाइटवर जाऊन ‘आयबी एसीआयओ टेक भरती’ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. आता, Apply Online वर क्लिक करा.
4. नंतर, नाव, पत्ता, शिक्षण, गेट स्कोर अशी महत्त्वाची माहिती भरा भरा.
5. माहिती भरल्यानंतर, फोटो, सही, पदवी आणि GATE स्कोअर कार्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. त्यानंतर उमेदवाराला अर्जाचं शुल्क भरावं लागेल.
7. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण प्रीव्ह्यू काळजीपूर्वक तपासा.
ADVERTISEMENT











