Govt Job: बँकेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) कडून ग्रुप B डेव्हलपमेंट असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शॉर्ट नोटिफिकेशननुसार, 17 जानेवारी 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
'नाबार्ड'च्या या भरतीच्या माध्यमातून ग्रुप B डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) ची एकूण 162 पदे भरली जाणार आहेत. सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
काय आहे पात्रता?
डेव्हलपमेंट असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही विषयात किमान 50 टक्के गुणांसह ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. तसेच, डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी) साठी, उमेदवारांकडे इंग्रजी/ हिंदी माध्यमात बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. पदवी अभ्यासक्रमादरम्यान, उमेदवाराने (हिंदी/ इंग्रजी) एक वैकल्पिक विषयात शिक्षण घेणं गरजेचं आहे. उमेदवारांनी इंग्रजीतून हिंदीमध्ये आणि त्याउलट भाषांतर करण्यास सक्षम असणं आवश्यक आहे.
हे ही वाचा: चूक आणि पाप यांच्यात नेमका फरक काय? प्रेमानंद महाराजांचं उत्तर वाचा...
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
कसा कराल अर्ज?
1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम www.nabard.org या नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. आता, होमपेजवरील Career Notices सेक्शनमध्ये भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
3. वेबसाइटवर नवीन असाल तर, Click Here for New Registration वर जा आणि आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्या.
4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या साहाय्याने वेबसाइटवर लॉगिन करा.
5. त्यानंतर, Development Assistant च्या भरतीसाठी अर्ज करण्याचा ऑप्शन दिसेल.
6. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
आता, अर्जाचं शुल्क भरा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.
भरतीसंबंधी अदिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार नाबार्ड (NABARD) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT











