Govt Job: 12 वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी! 3000 हून अधिक पदांसाठी भरती, लवकरच करा अर्ज...

मुंबई तक

• 12:44 PM • 30 Nov 2025

रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC) अंडर ग्रेजुएट (UG) च्या भरतीसंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे.

12 वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी!

12 वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

12 वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी!

point

रेल्वेकडून 3000 हून अधिक पदांसाठी भरती अन्...

point

कसा आणि कधीपर्यंत कराल अर्ज?

RRB NTPC 2025 Recruitment: रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC) अंडर ग्रेजुएट (UG) च्या भरतीसंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने एनटीपीसी यूजी भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढे ढकलली आहे. या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अजून अर्ज केलेला नाही, ते 4 डिसेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांना अर्जाची फी सुद्धा 6 डिसेंबर पर्यंत भरता येईल. 12 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. 

हे वाचलं का?

दरम्यान, रेल्वे भरती बोर्ड NTPC UG 2025 साठी अर्ज कसा करायचा, परीक्षा कशी असेल आणि पात्रता निकष काय असतील याबाबत सविस्तर जाणून घ्या. 

कशी होणार परीक्षा? 

रेल्वे भरती बोर्ड (RRB)च्या NTPC भरतीसाठी परीक्षा कंप्यूटर बेस्ट लेखी परीक्षा (CBT) घेतली जाईल. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं जाईल. त्यासाठी उमेदवारांना एक्झाम सेंटरमध्ये आधार कार्ड घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे. 

RRB NTPC भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना rrbapply.gov.in या रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. 

हे ही वाचा: "माझ्या बहिणीशी मैत्री का केलीस?..." संतापलेल्या भावाने तरुणाला रस्त्यात गाठून केला निर्दयी खून!

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. त्यानंतर, होमपेजवरील CEN 06/2024 NTPC Undergraduate या लिंकवर क्लिक करा. 
3. आता Registration Link वर क्लिक करा. 
4. फॉर्म उघडल्यानंतर त्यात तुमची आवश्यक माहिती भरा. 
5. अर्ज पूर्ण भरल्यानंतर, तो डाउनलोड करून घ्या. 

हे ही वाचा: ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं

'या' पदांसाठी भरती 

रेल्वे भरती बोर्डाकडून NTPC अंडर ग्रेजुएट (UG) पदाच्या एकूण 3058 रिक्त जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. या भरतीअंतर्गत, ट्रॅफिक असिस्टंट, कमर्शिअल क्लर्क टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, जुनिअर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. 28 ऑक्टोबर रोजी रेल्वेने या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलं होतं. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 27 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.