SBI Recruitment 2025: बँकेत सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या मोठ्या सरकारी बँकेत लवकरच मोठ्या पदांसाठी भरती जाहीर केली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पुढील 5 महिन्यांत 3500 ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
या भरतीसंदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं नसून बँकेकडून लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.bank.in वर या रिक्त पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल. SBI चे डेप्यूटी मॅनेजिंग डायरेक्टर (HR) आणि चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर (CDO) किशोर कुमार पोलुदासु यांनी स्वतः या स्टेट बँकेच्या नवीन भरतीसंदर्भात माहिती दिली.
यापूर्वी देखील केली भरती
अधिकाऱ्यांनी पीटीआयला याबाबत माहिती देताना सांगितलं की, बँकेने आधीच आयटी आणि सायबर सुरक्षेसाठी 1,300 अधिकाऱ्यांची भरती केली आहे. तसेच, 541 पीओ पदांसाठी देखील नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं असून त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज सुद्धा स्विकारण्यात आले आहेत. PO पदांसाठी निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतील: प्रिलिम्स, मेन्स, सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखत. याव्यतिरिक्त, SBI 3000 सर्कल बेस्ड ऑफिसर्स (सीबीओ) भरती करण्याची तयारी करत असून ते या आर्थिक वर्षात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा: नवी मुंबईतील फार्महाऊसच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा... मॅनेजरच्या मोबाईलमध्ये सापडले महिलांचे 17 घाणेरडे व्हिडीओ!
काय आहे पात्रता?
SBI मध्ये सीबीओ ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
हे ही वाचा: अल्पवयीन विद्यार्थ्याचं अपहरण करण्याची धमकी आणि पैशांची मागणी... ठाण्यातील आरोपीला अटक
कशी होणार निवड?
एसबीआय सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड बऱ्याच टप्प्यांद्वारे केली जाईल, जसे की, ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग आणि मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी. या भरतीमध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेतली जाणार असून त्यामध्ये इंग्रजी भाषा, बँकिंग नॉलेज, सामान्य ज्ञान आणि कंप्यूटर अप्टिट्यूड अशा चार विषयांमधून प्रश्न विचारले जातील. एसबीआय या भरतीसंदर्भातील अधिक अपडेट्स त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल. अपडेट्ससाठी उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा.
ADVERTISEMENT











