अल्पवयीन विद्यार्थ्याचं अपहरण करण्याची धमकी आणि पैशांची मागणी... ठाण्यातील आरोपीला अटक

मुंबई तक

ठाण्यातून पोलिसांनी अपहरणाची धमकी देऊन पैसे मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका स्कूल बस चालकाला अटक केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

विद्यार्थ्याचं अपहरण करण्याची धमकी आणि पैशांची मागणी...
विद्यार्थ्याचं अपहरण करण्याची धमकी आणि पैशांची मागणी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्याचं अपहरण करण्याची धमकी आणि पैशांची मागणी...

point

ठाण्यातील आरोपीला अटक

Thane Crime: ठाण्यातून पोलिसांनी अपहरणाची धमकी देऊन पैसे मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका स्कूल बस चालकाला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी बस चालकावर स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याच्या पालकांकडून तब्बल 4 लाख रुपये पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अज्ञात नंबरवरून टेक्स्ट मॅसेज 

पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं की, आरोपी बस चालक ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथे मोबाईल फोन आणि सिम कार्डचे दुकान चालवत होता. मात्र, भरपूर पैसे मिळण्याच्या नादात त्याने एक योजना आखली. काशिमिरा येथील रहिवासी असलेल्या एका मुलाच्या आईला शनिवारी एका अज्ञात मोबाइल नंबरवरून टेक्स्ट मॅसेज मिळाला. त्यामध्ये, 4 लाख रुपये न दिल्यास मुलाचं अपहरण करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर, त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.

ड्रायव्हरचं मोबाईल आणि सिम कार्डचं दुकान 

तपासादरम्यान, हा मॅसेज स्थानिक मोबाईल फोन दुकानाशी संबंधित एका नंबरवरून ट्रेस केला. आरोपी स्कूल बस ड्रायव्हरचे मोबाईल आणि सिम कार्डचं दुकान असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याने त्याच्या एका अशिक्षित ग्राहकाचं सिम कार्ड घेतलं आणि ते एका निष्क्रिय सिम कार्डने बदललं.

व्हाट्सअॅपद्वारे धमक्या पाठवल्या 

त्यानंतर आरोपी ड्रायव्हरने त्याच सिम कार्डचा वापर करून मुलाच्या कुटुंबियांना व्हाट्सअॅपद्वारे धमक्या पाठवल्या. त्याने खंडणीच्या मॅसेजमध्ये मुलाचा फोटो देखील पाठवला होता, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांनी 37 वर्षीय बस चालक हरिराम सोमा याची चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि रविवारी त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp