Govt Job: 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये ऑफिसर पदावर भरती व्हायचंय? आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या रेग्युलर बेस पदांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे.

'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...

'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा नोकरी...

मुंबई तक

• 02:38 PM • 11 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये मोठ्या पदांवर निघाली भरती

point

आता कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा ऑफिसर पदावरील नोकरी...

SBI Recruitment 2025: सरकारी बँकेत ऑफिसर पदावर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या रेग्युलर बेस पदांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 8 ऑक्टोबरपासून sbi.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

SBI च्या डेप्यूटी मॅनेजर पदावरील भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इकोनॉमिक्स विषयात मास्टर्स डिग्री/ इकोनॉमिमेट्रिक्स/ मॅथेमेटिकल इकोनॉमिक्स/ फायनान्शियल इकोनॉमिक्स विषयात किमान 60 टक्के गुणांसह डिग्री किंवा समकक्ष पात्रता असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. 

वयोमर्यादा: तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांच्या वयाच्या गणना 1 ऑगस्ट 2025 तारखेच्या आधारे केली जाईल. 

पगार: 64,820 रुपये  ते 93,960 रुपये (याव्यतिरिक्त इतर सरकारी भत्ते) 

निवड: या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय केवळ शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाईल. 

अर्जाचं शुल्क 

भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सामान्य (Open)/ ईडब्ल्यूएस (EWS)/ ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC)/एसटी (ST) /पीडब्ल्यूबीडी(PwBD) प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.  

हे ही वाचा: 40 लोकांना अश्लील मॅसेज पाठवण्यात आल्याचा दावा, अमरावतीतील माजी न्यायाधीशाकडून 31 लाख रुपये लुबाडले अन्...

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम sbi.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. तिथे Careers सेक्शनमध्ये जाऊन Recruitment of Specialist cadre officer on Regular Basis लिंकवर क्लिक करा. 
3. त्यानंतर,  Apply Online या टॅबवर जा. 
4. वेबसाइटवर रजिस्टर्ड नसाल तर Click for New Registration लिंकवर क्लिक करा. 
5. आता आपली आवश्यक माहिती भरून सबमिट करा आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरच्या साहाय्याने एसबीआयच्या वेबसाइटवर लॉगिन करा आणि सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. 

हे ही वाचा: विवाहितेचे एकाच वेळी दोन तरुणांसोबत प्रेमसंबंध! संतापलेल्या प्रियकराने दिली मोठी शिक्षा, मुलीला सुद्धा सोडलं नाही...

शेवटी, आवश्यक सर्व डॉक्यूमेंट्स योग्य साइजमध्ये अपलोड करा आणि अर्जाचं शुल्क भरा. आता फॉर्मची फायनल प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

    follow whatsapp