अमरावती पोलीस आयुक्तालयात जवानानं स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन, पोलीस दलात एकच खळबळ

मुंबई तक

26 Mar 2026 (अपडेटेड: 26 Mar 2026, 02:19 PM)

Amravati suicide : अमरावती पोलीस आयुक्तालयात धक्कादायक घटना घडली आहे. 'क्विक रिस्पॉन्स टीम'चा (QRT) जवान विजय नागपुरे याने स्वत:वर गोळीबार करत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Amravati suicide

Amravati suicide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अमरावती पोलीस आयुक्तालयात स्वत:वर गोळी झाडून जवानानं जीवन संपवलं

point

प्राथमिक तपासातून काय समोर आले? 

Amravati Suicide : अमरावती पोलीस आयुक्तालयात धक्कादायक घटना घडली आहे. 'क्विक रिस्पॉन्स टीम'चा (QRT) जवान विजय नागपुरे याने स्वत:वर गोळीबार करत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. रात्रपाळीनंतर सर्व जवान हे आपले शस्त्र जमा करण्यासाठी एकत्र जमले होते, त्याचदरम्यान ही घटना घडली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण : सायकलिंग करत असलेल्या बिझनेसमनला चिरडलं, अल्पवयीन मुलाची बेदरकार कार ड्रायव्हिंग; पाहा VIDEO

अमरावती पोलीस आयुक्तालयात स्वत:वर गोळी झाडून जवानानं जीवन संपवलं

घडलेल्या घटनेनुसार, स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवणाऱ्या जवानाचे नाव विजय नागपुरे असे आहे. आयुक्तालयाच्या इमारतीमधील ड्युटी रुममध्ये तो एकटाच थांबला होता. त्याने गोळी झाडल्याचा आवाज सर्व घटनास्थळी घुमला. इतर जवान तात्काळपणे घटनास्थळी धावले, तिथे त्यांना विजय नागपुरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला होता. 

प्राथमिक तपासातून काय समोर आले? 

कोणताही विलंब न करता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उपायुक्त (DCP) गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासातून समोर आले की, ही आत्महत्येची घटना असल्याचे समोर आले. नागपुरे यांनी आपली शासकीय पिस्तुल वापरून स्वत:वर गोळीबार केला. घटनास्थळी त्या खोलीत तो एकटाच होता, इतर जवानांनी आपली शस्त्रे यापूर्वी जमा केली होती आणि ते तिथून निघून गेले. 

हे ही वाचा : दुर्गा देवीच्या यात्रेत 3 वर्षाच्या चिमुरडीला बघून अज्ञात व्यक्ती नराधम झाला, मंदिरामागे नेत केले शोषण, रक्ताने माखलेली पँट...

मृत जवान अविवाहित होता आणि अमरावतीत एका भाड्याच्या घरात तो एकटाच होता.  प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक अडचण-विशेषत: शेअर बाजारातील नुकसानीमुळे आलेला ताण हेच जीवन संपवण्यामागील कारण आहे, या सखोल तपासानंतर या घटनेला अधिकृत दुजोरा मिळाला. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत .