दुर्गा देवीच्या यात्रेत 3 वर्षाच्या चिमुरडीला बघून अज्ञात व्यक्ती नराधम झाला, मंदिरामागे नेत केले शोषण, रक्ताने माखलेली पँट...

मुंबई तक

crime news : दुर्गा देवीच्या यात्रेत एका 3 वर्षीय चिमुरडीला मंदिराच्या मागे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना बुधवारी रात्री दुर्गा देवीच्या यात्रेदरम्यान घडल्याचं वृत्त आहे. मुलगी यात्रेत हरवल्याचा फायदा घेत एका अज्ञाताने तिच्याशी घृणास्पद कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

दुर्गा देवीच्या यात्रेत एका 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

point

मंदिरामागे नेत अज्ञात व्यक्तीत नराधम जागा झाला

Crime news : दुर्गा देवीच्या यात्रेत एका 3 वर्षीय चिमुरडीला मंदिराच्या मागे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना बुधवारी रात्री दुर्गा देवीच्या यात्रेदरम्यान घडल्याचं वृत्त आहे. मुलगी यात्रेत हरवल्याचा फायदा घेत एका अज्ञाताने तिच्याशी घृणास्पद कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला. ही घटना पाटणा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : कल्याण : सायकलिंग करत असलेल्या बिझनेसमनला चिरडलं, अल्पवयीन मुलाची बेदरकार कार ड्रायव्हिंग; पाहा VIDEO 

दुर्गा देवीच्या यात्रेत एका 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार 

घडलेल्या घटनेनुसार, ती निष्पाप मुलगी आपल्या कुटुंबासोबत गावात भरलेल्या चैत्र दुर्गा पूजेच्या यात्रेत गेली होती. यात्रेत प्रचंड गर्दी असल्याचे पाहून ती कुटुंबापासून हरवली गेली. बराच वेळानंतर, जेव्हा तिच्या कुटुंबीयांच्या अचानकपणे लक्षात आले की, आपली मुलगी गर्दीत कुठेतरी हरवून गेली. तिचा परिसरात शोध गेण्यात आला, पण ती सापडली नाही. तिचे कुटुंबीय तिला शोधण्यासाठी  मंदिरात गेले आणि शोध घेताना त्यांना मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता.

संबंधित मुलगी पूर्णपणे रक्ताळलेली

कुटुंबीयांनी हे चित्र पाहिले असता, ते हादरून गेले. संबंधित मुलगी पूर्णपणे रक्ताळलेली होती. तिच्या पँटमधून रक्त वाहत होते.  कुटुंबीयांनी तिला तातडीने बरह उपविभागीय रुग्णालयात नेले, तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला चांगल्या उपचारासाठी पाटणा येथे पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्यावर मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर; अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?

भदौर पोलीस ठाण्याचे प्रमुख शत्रुघ्न कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी लेखी तक्रार दाखल केल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करून अटक करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात शांतता पसरली.  

हे वाचलं का?