हडपसरमध्ये शाळकरी मुलीवर 23 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Crime : हडपसरमध्ये शाळकरी मुलीवर 23 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

pune Crime

pune Crime

मुंबई तक

02 Nov 2025 (अपडेटेड: 02 Nov 2025, 09:48 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हडपसरमध्ये शाळकरी मुलीवर 23 वर्षीय तरुणाकडून अत्याचार

point

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Crime : पुण्यातील हडपसर परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीची फसवणूक करुन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीचे नाव संदीप मोहन चव्हाण (वय २३, रा. थिटे वस्ती, खराडी) असे असून, पीडित मुलीच्या आईने या संदर्भात तक्रार दिली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तक्रारदार महिलेच्या मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी जवळीक साधली. काही काळानंतर त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आश्वासन देत तिची फसवणूक केली. या घटनेमुळे अल्पवयीन मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. अखेर तिने सर्व घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.

हेही वाचा : माजी नगरसेवकाच्या हत्येचा बदला, आरोपीच्या भावाला गोळ्या घालून संपवलं, आंदेकर-कोमकर गँगवॉर; काय काय घडलं?

हडपसर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांखाली तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीचे जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात हलवले आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, “आरोपीने अल्पवयीन मुलीची फसवणूक केली असून, तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.” या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. सामाजिक संस्थांनीदेखील अशा प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबांना तातडीची मदत आणि कायदेशीर सहाय्य मिळावे, अशी मागणी केली आहे.

तपास अधिकारी सांगतात की, या प्रकरणात प्राथमिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. वाढत्या सोशल मीडिया वापरामुळे ओळखीतून किंवा ऑनलाइन माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे वाढत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हालचाली, मैत्रीचे स्वरूप आणि सोशल नेटवर्कवरील सक्रियतेवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

CCTV: निखील कांबळे मागून आला आणि सिद्धारामचा घेतला जीव, कुऱ्हाडीचे वार घालतच बसला.. नेमकं असं घडलं तरी काय?

    follow whatsapp