पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, 'त्या' कपड्याच्या दुकानात काय घडलं?

मुंबई तक

09 Apr 2026 (अपडेटेड: 09 Apr 2026, 12:49 PM)

काही मुली एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी कपडे चेंज करण्यासाठी ट्रायल रुम नसल्याने दुकानदाराने त्यांना स्टोअर रुम वापरायला सांगितली. यानंतर स्टोअर रुममध्ये त्या मुलींना धक्काच बसला.

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

point

'त्या' कपड्याच्या दुकानात काय घडलं?

Pune Crime : काही तरुणी एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र त्या दुकानात ट्रायल रुम नव्हती. त्यामुळे दुकानदाराने त्यांना कपडे बदलण्यासाठी स्टोअर रुममध्ये जाण्यास सांगितले. मात्र या स्टोअर रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे त्या मुलींना सांगण्यात आले नव्हते. मात्र ही गोष्ट मुलींच्या लक्षात आली आणि त्यांना धक्काच बसला. 

हे वाचलं का?

'कपडे बदलण्यासाठी स्टोअर रुम वापरा'

ही घटना आहे पुण्याच्या कामशेत परिसरातील. येथील मुकेश फॅन्सी कॉर्नर नावाच्या कपड्याच्या दुकानात काही मुली खरेदीसाठी गेल्या होत्या. मात्र त्यांच्यासोबत पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पनादेखील त्यांना नव्हती. दुकानात गेल्यावर त्यांनी ट्रायल रुमची चौकशी केली, मात्र त्या दुकानात ट्रायल रुमच नव्हती. त्यामुळे दुकानदार मुकेश मुथा याने कपडे बदलण्यासाठी त्यांना स्टोअर रुम वापरण्यास सांगितले. त्या मुली स्टोअर रुममध्ये गेल्या आणि कपडे बदलत असतानाच अचानक लाईट गेली. त्यामुळे अंधारात लाल दिवा चमकताना त्या मुलींना दिसला. 

हे ही वाचा : 'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर, प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

स्टोअर रुममधील लाईट गेली अन्..

हा लाल दिवा कशाचा आहे याची त्या मुलींनी बारकाईने तपासणी केली. यावेळी तो सीसीटीव्ही असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्काच बसला. यानंतर त्या मुलींनी रागाच्या भरात दुकानदाराला याचा जाब विचारला. मात्र माफी वगैरे न मागता उलट त्याने मुलींना धमकवायला सुरुवात केली. मात्र पीडित तरुणींनी हिंमत दाखवत कामशेत पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या प्रकाराविरोधात त्यांनी दुकानदार मुकेश मुथा विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मुथाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 77 आणि 352 विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

हे ही वाचा : बीड : केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती मृत्यू, नियंत्रण सुटल्याने कारचा चक्काचूर

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मात्र यामध्येही एक महत्त्वाची बाब आहे. ती म्हणजे एफआयआर नोंदवण्यात पोलिसांनी केलेली दिरंगाई. ही घटना घडली 16 मार्च रोजी. मात्र त्यानंतर एफआयआर नोंदवण्यास विलंब का झाला असा प्रश्न विचारला जात आहे. इतकंच नाही तर महिलांच्या सुरक्षिततेबाबतच्या या गंभीर गुन्ह्यात मुथाला इतक्या लवकर जामीन कसा मिळाला याचे उत्तरही अनुत्तरित आहेत. या प्रकरणानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता होत आहे.

हे ही वाचा : लग्नानंतर नवऱ्याने फक्त एकदाच ठेवले शारीरिक संबध, बायकोच्या हाती लागली 'ती' फाईल अन् घडलं भयानक कांड

समाजासाठी धोक्याचा इशारा

पोलिसांवर होणार हे आरोप मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे मात्र महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गैरवापर ही फक्त एक घटना नसून, संपूर्ण समाजासाठी तो एक धोक्याचा इशारा आहे.