Pune : दोन शेतकरी निरा-भीमा बोगद्यात उतरले अन् नको ते घडलं!

इंदापूर तालुक्यातील कझार गावाजवळ हा अपघात झाला. भादलवाडी ते तावशी दरम्यान नीरा आणि भीमा नद्यांना जोडण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. अनिल नरुटे व रतीलाल नरुटे हे शेतकरी या बोगद्यात उतरले होते. पण, यावेळी नको ते घडलं.

Pune News 2 Farmers Fell 300 feet deep in Neera Bhima Tunnel and Died

Pune News 2 Farmers Fell 300 feet deep in Neera Bhima Tunnel and Died

रोहिणी ठोंबरे

23 Nov 2023 (अपडेटेड: 23 Nov 2023, 04:04 AM)

follow google news

Pune News : एकीकडे उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर येथील नीरा भीमा बोगद्यात (Neera Bhima Tunnel) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन शेतकरी 300 फूट खोल बोगद्यात पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. घटनास्थळी मोठी क्रेन मागवण्यात आली आणि त्याद्वारे दोन्ही शेतकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र बचावकार्यावेळी ते दोघेही मृत अवस्थेत आढळले. (Pune News 2 Farmers Fell 300 feet deep in Neera Bhima Tunnel and Died)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ट्वीटद्वारे या घटनेची माहिती देत दु:ख व्यक्त केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निरा भिमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात हे दोन शेतकरी उतरले होते आणि त्यादरम्यान दोघंही 300 मीटर खोल कोसळले.

वाचा: 300 रूपयांसाठी नग्न केलं, नंतर धारदार शस्त्राने… ठाण्यात मुलासोबत नेमकं काय घडलं?

इंदापूर तालुक्यातील कझार गावाजवळ हा अपघात झाला. भादलवाडी ते तावशी दरम्यान नीरा आणि भीमा नद्यांना जोडण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. अनिल नरुटे व रतीलाल नरुटे हे शेतकरी या बोगद्यात उतरले होते. दोघांनाही आपल्या शेतात बोगद्याद्वारे विद्युत पंपाने पाणी द्यायचे होते. पण, यावेळी नको तेच घडलं.

वाचा: MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?

बोगद्यात उतरताना शेतकऱ्याचा तोल गेला अन्…

दोन्ही शेतकरी बोगद्यात शिरल्यावर त्यांचा तोल गेला आणि ते आत पडले. लोकांना या घटनेची माहिती मिळताच बोगद्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांशी तातडीने संपर्क साधण्यात आला. यानंतर घटनास्थळी मोठी क्रेन आणण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. पण ही मोठी दु:खद आणि दुर्दैवी घटना समोर आली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर संपूर्ण इंदापूर परिसरात शोककळा पसरलेली आहे.

    follow whatsapp