रायगड : 23 वर्षीय तरुणीला तपासण्यासाठी बेडवर झोपायला सांगितलं, अन् 75 वर्षीय डॉक्टरने...

Raigad Crime : रायगड : 23 वर्षीय तरुणीला तपासण्यासाठी बेडवर झोपायला सांगितलं, अन् 75 वर्षीय डॉक्टरने...

Raigad Crime

Raigad Crime

मुंबई तक

14 Nov 2025 (अपडेटेड: 14 Nov 2025, 03:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रायगड : 23 वर्षीय तरुणीला तपासण्यासाठी बेडवर झोपायला सांगितलं

point

अन् 75 वर्षीय डॉक्टरने केलं अश्लील कृत्य

Raigad Crime : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना अलिबागच्या चेंढरे परिसरात आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 75 वर्षांच्या आयुर्वेदिक वैद्याने उपचारासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

हे वाचलं का?

आरोग्य तपासणीच्या नावाखाली डॉक्टरांने तरुणीच्या आईला बाहेर पाठवले

मुंबईतील 23 वर्षीय तरुणी अस्थमाच्या उपचारासाठी आईसोबत डॉक्टर भास्कर देसले (वय 75, रा. शिवनेरी बिल्डिंग, गौरवनगर, अलिबाग) यांच्या निवासस्थानी गेली होती. आरोग्य तपासणीच्या नावाखाली डॉक्टरांने तरुणीच्या आईला बाहेर पाठवले आणि बेडरूममध्ये एकटीला बोलावले. त्यानंतर तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला असून अलिबाग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: विवाहित मुलगी प्रियकरासोबत गेली पळून! सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...

तक्रारीनुसार, तपासणीदरम्यान आरोपीने तरुणीला बेडवर झोपवून तिच्या कपड्यांच्या आत हात घालून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. वृद्ध डॉक्टर समाजात विश्वासार्ह मानले जात असल्याने या घटनेने स्थानिकांमध्ये आणखी नाराजी निर्माण झाली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 219/2025 नुसार भा. न्या. संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या देखरेखीखाली महिला उपनिरीक्षक टिवरे या तपास करत असून घटनास्थळी सविस्तर तपास सुरू आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अलिबागमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करत ते म्हणाले की अशा प्रकारच्या घटनांवर वेळेत आणि कठोर कारवाईच आवश्यक आहे. अलिबागमधील ही घटना महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली असून, यामुळे पोलिस यंत्रणा आणि नागरिकांनी आणखी सजग होण्याची गरज पुन्हा एकदा पुढे आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालन्यातील तरुणाचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, दीर-भाऊजयीने मिळून नवऱ्याला कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

 

    follow whatsapp