अलिबाग हादरलं! तरुणाचा तरुणीवर होता 'तसला' संशय, बॉयफ्रेंडची सटकली अन् गर्लफ्रेंडच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत...

Raigad Crime : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबागमध्ये कणकेश्वर मंदिरात बसलेल्या एका तरुण आणि तरुणाने त्यांच्यात वादंग निर्माण झाला आहे.

raigad crime

raigad crime

मुंबई तक

• 05:51 PM • 14 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक धक्कादायक घटना

point

तरुणाचा प्रेयसीवर प्राणघातक हल्ला

point

नेमकं काय आहे प्रकरण?

Raigad Crime : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबागमध्ये कणकेश्वर मंदिरात बसलेल्या एका तरुण आणि तरुणाने त्यांच्यात वादंग निर्माण झाला आहे. याच वादातून या तरुणाने आपल्या प्रेयसीवर बॅगेत घेऊन आलेल्या हातोड्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ही तरुणी गंभीरपणे जखमी झाली. हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव सुरज शशिकांत बुरांडे असं तरुणाचं नाव आहे. संबंधित प्रकरणाचा अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : परभणी हादरलं! विवाहित महिलेच्या प्रेमात वेडा झाला तरुण, लग्न करण्याचा धरला हट्ट, कुटुंबियांनी विरोध केल्यानं थेट रेल्वेखाली...

तरुणाचा प्रेयसीवर प्राणघातक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधामध्ये आलेल्या संशयामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कनकेश्वर मंदिर परिसरात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तरुणाने प्रेयसी संचिता विनायक सलामतवर लोखंडी हातोड्याने घाव घालून तिला ठार केलं. 

बॅगेतून लोखंडी हातोडा काढत संचिताच्या डोक्यावर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता दुसऱ्याच तरुणाशी बोलत असल्याच्या संशयावरून सुरजच्या मनात राग निर्माण झाला होता. तेव्हा दोघेही कनेश्वर मंदिराजवळील वडाच्या झाडाखाली बसले होते. तेव्हा सुरजने अचानकपणे बॅगेतून लोखंडी हातोडा काढत पीडित तरुणी संचिताच्या डोक्यावर आणि कपाळावर घाव घालत हल्ला केला.  

हे ही वाचा : खोक्या भोसलेच्या कुटुंबानंतर आणखी एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, बीडमध्ये नेमकं चाललं काय?

तरुण इतक्यावरच न थांबता तिला जवळच्या तारेच्या जाळीत ओढत  दगडाने ठेचत मारहाण केली होती. त्यानंतर तरुणी जमिनीवरच पडली होती. आरोपीने तिला जवळपास तीन तास तिथेच ठेवले. या काळात तिला वैद्यकीय मदत मिळाली नाही. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. संचिताला गंभीर अवस्थेत रुग्णालायता दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp