शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावले, नंतर तिचा हात पकडत दीड महिन्यानंतर भयंकर... रत्नागिरीत खळबळ

Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

ratnagiri crime

ratnagiri crime

मुंबई तक

• 08:33 PM • 21 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा

point

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर विनयभंग

point

नेमकं काय घडलं?

Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना 23 जुलै रोजी घडली असून 19 सप्टेंबर रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात संशयित आरोपी शिक्षक निलेश अशोक कांबळेसह इतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीएसटी कराबाबत मोठी घोषणा, दैनंदिन वस्तूंवर 'एवढा' कर, तर हॉटेल्ससह इतर वस्तूंना...

विद्यार्थिनीला चार्जारची मागणी केली अन्...

घडलेल्या एकूण घटनेनुसार, 23 जुलै रोजी शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना चार्जरची मागणी की घरी बोलावले. त्यापैकी एक विद्यार्थिनीला जवळच्या दुकानात बसवले आणि दुसऱ्या विद्यार्थिनीला हॉलमध्ये नेले. नंतर तिचा हात पकडत तिच्याशी  गैरवर्तन केले. त्यानंतर मुलगी आपल्या घरी परतली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. 

दीड महिन्यानंतर...

पालकांनी अखेर दीड महिन्यानंतर म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी संबंधित बाणकोड सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल करण्यापूर्वी गावातील काही ग्रामस्थांनी दबाव टाकून तक्रार न करण्यास सांगितली. 

हे ही वाचा : तरुण घरातून झाला होता गायब, नातेवाईकांनी केली शोधाशोध, अखेर तलावातील पाण्यावर मृतदेह तरंगत होता अन् जीभ...

या प्रकरणी संशयित आरोपी निलेश अशोक कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 कलम (8), (12) आणि (21) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार रोखण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे आणि राकेश साळुंखे या नऊ जणांविरोधातही गुन्हे दाखल झाले आहेत. बाणकोट पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली. 

    follow whatsapp