तरुण घरातून झाला होता गायब, नातेवाईकांनी केली शोधाशोध, अखेर तलावातील पाण्यावर मृतदेह तरंगत होता अन् जीभ...
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात गायब झालेल्या तरुणाचा मृतदेह एका तलावात आढळला. मासेमारी करणाऱ्या तरुणाने मृतदेह तलावावर तरंगताना पाहिला आणि हे प्रकरण समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
21 वर्षीय तरुणाचा मृतदेह जळगावच्या तलावात
जीभ कापल्याचा संशय
नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime : जळगावातील मेहरून तलावात एका 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. गेली दोन दिवस तरुण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, तलावात त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर तरुणाची जीभ छाटून टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात तरुणाने आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात घडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत अवस्थेत असलेल्या तरुणाचे नाव शेख अबूजर शेख युनूस असे आहे.
हे ही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं x अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की देशाचे झेंडे करण्यात आले होते शेअर, नेमकं काय घडलं?
तरुणाची जीभ कापल्याचा संशय
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पोलीस संबंधित घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांनी धक्कादायक आरोप केला आहे. आरोपीने तरुणाची जीभ कापल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच हा एक घातपात असल्याचा आरोप करण्यात आला. मृत तरुण हा जळगावच्या बिलाल चौक परिसरात तांबापुरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतदेहाची ओळख आली समोर...
मिळालेल्या माहितीनुसार, अबूजर हा काही दिवसांआधी घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो परतलाच नाही. मृताच्या वडिलांनी शोधाशोध केली, पण तो सापडलाच नाही. अखेर, मेहरून तलावात मासेमारीसाठी आलेल्या एका व्यक्तीला तलावात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला मृतदेहाची ओळख पटल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : पैशांमुळे दोन्ही सख्खे भाऊ झाले पक्के वैरी, मोठ्याने धाकट्यावर चाकूने सपासप वार करत संपवत...
अबूजरच्या अंगावर घरातून बाहेर पडतानाचे कपडे होते. त्यानंतर खिशात त्याचा मोबाईल सापडला होता. मात्र, नंतर कुटुंबियांनी शोध घेतला असता, तरुणाच्या मृतदेहाची जीभ कापलेल्या अवस्थेत दिसत होती, आता याच संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.










