पैशांमुळे दोन्ही सख्खे भाऊ झाले पक्के वैरी, मोठ्याने धाकट्यावर चाकूने सपासप वार करत संपवत...

मुंबई तक

crime news : दोन भावांमधील 52 वर्षीय वर्गीस नावाच्या मोठ्या भावावर राजूने चाकूने सपासप वार करत हत्या केली, पैशांच्या कराणावरूनच हा वाद झाला आणि त्यातून भावानेच भावाचा खून केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पैशांवरून भावांमध्ये वाद

point

नेमकं काय घडलं?

Crime News : पैशांसमोर सर्वांना सर्वच गोष्टी अगदीच नगन्य वाटू लागतात. पैशांसाठी कोणतीबी व्यक्ती खालच्या पातळीवर जाते. पैशांमुळे अनेकदा नातेसंबंधही उद्ध्वस्त होताना दिसतात, अशीच एक घटना आता समोर आली आहे. दोन भावांमधील 52 वर्षीय वर्गीस नावाच्या मोठ्या भावावर राजूने चाकूने सपासप वार करत हत्या केली. ही घटना केरळातील मलप्पुरम जिल्ह्यात शुक्रवारी घडली होती. 

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं x अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की देशाचे झेंडे करण्यात आले होते शेअर, नेमकं काय घडलं?

पैशांवरून वाद नंतर...

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की ही घटना शुक्रवारी रात्री 9:40 च्या सुमारास घडली होती. राजू मोडापोइकातील नायिकनकुली येथील धाकटा भाऊ वर्गीसच्या घरी पोहोचला, त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर वाद विकोलापा गेल्यानंतर राजूने चाकू काढून वर्गीसवर हल्ला केला. जखमी झालेल्या वर्गीसला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

वाझिक्कडवू पोलीस हे घटनास्थळी पोहोचले होते, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही भावांमध्ये बऱ्याच काळापासून आर्थिक कारणांवरून वाद सुरु होता. वर्गीसने त्याचा मोठा भाऊ राजूला पैसे उधार देण्यात आले होते, जे राजूने दारूवर खर्च केल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे ही वाचा : निष्पाप मुलीला फूस लावून खोलीत नेलं... 10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार! रडत रडत घरी आली अन्...

वर्गीस यांनी अलिकडेच राजूला बेदम मारहाण केली होती. या शत्रुत्वामुळे राजूला गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याने पोलिसाचं म्हणणं आहे. पोलिसांनी शनिवारी सकाळी आरोपी राजूला अटक केली. वाझिक्कडवू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तापस सुरू केला होता. या घटनेनं पुन्हा एकदा वैयक्तिक संघर्षामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर मोठा परिणाम निर्माण झाला आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp