Bank Of India Recruitment 2025: बँकेत ऑफिसर पदावर नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. 'बँक ऑफ इंडिया'कडून विविध डिपार्ट्समेंटमध्ये चीफ मॅनेजर, सीनिअर मॅनेजर, लॉ ऑफिसर आणि मॅनेजर सारख्या मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं नोटिफिकेशन सुद्धा वेबसाइटवर प्रसिद्ध झालं असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
ADVERTISEMENT
या भरतीच्या माध्यमातून 'बँक ऑफ इंडिया'कडून आयटी, प्रोजेक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, एआय डेव्हलपर, लॉ (कायदा) ऑफिसर, मॅनेजर, सिव्हिल इंजिनिअर/इलेक्ट्रिकल इंजिनिअर अशा स्पेशलिस्ट ऑफिसरची 115 पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह बी.ई/बीटेक कंप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स कम्यूनिकेन किंवा एमसीए/एमएससी/कंप्यूटर साइंस/आईटी या क्षेत्रात पदवीची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, Oracle सर्टिफिकेट आणि Oracle सर्टिफाइड प्रोफेशनल सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांच्या कार्याचा अनुभव देखील ग्राह्य धरला जाणार आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार बँकेचं अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा तपासू शकतात.
वयोमर्यादा: प्रवर्गानुसार, 23 ते 45 वर्षे
पगार: दरमहा 64,820 ते 1,20,940 रुपये
हे ही वाचा: एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध... पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे केले अन्...
कसा कराल अर्ज?
1. उमेदवार www.bankofindia.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
2. वेबसाइटवर गेल्यावर "Recruitment of Officers in various streams upto Scale IV- Project No. 2024-2505 Notice dated 01.10.2" या भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर, Apply Online बॉक्सवर क्लिक करा.
4. आता, Click here for New Registration वर जाऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
5. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाल्यानंतर, याच्या साहाय्याने पुन्हा एकदा लॉगिन करा.
6. नंतर, उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पत्ता, प्रवर्ग अशी आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
7. माहिती भरल्यानंतर स्कॅन केलेला फोटो आणि सही योग्यरित्या अपलोड करा.
8. आता प्रवर्गानुसार, अॅप्लिकेशन फी सबमिट करा.
हे ही वाचा: "तो माझ्या बायकोला घेऊन..." रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुण! पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्क 175 रुपये भरावे लागेल. सामान्य आणि इतर उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल.
ADVERTISEMENT











