एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध... पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे केले अन्...
एका विवाहित प्रियकराने बसमध्येच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध...
पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या!
मृतदेहाचे तुकडे केले अन्...
Crime News: काही दिवसांपूर्वी पोलिसांना, नाल्यात एका महिलेचं छाटलेलं मुडकं आणि हात आढळून आले होते. संबंधित प्रकरणात पोलिसांनी शोध घेतला असून घटनेचा पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. खरं तर एका विवाहित प्रियकराने ब्लॅकमेलिंगला वैतागून बसमध्येच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रकरण हे दिल्लीच्या नोएडामधील असल्याची माहिती आहे.
एक बस लाइट ऑफ करून जाताना दिसली...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पायात जोडवी होती. त्यावरूनच, पीडिता विवाहित असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांच्या तपासादरम्यान, 5 नोव्हेंबर रोजी रात्री जवळपास 9 वाजताच्या सुमारास घटनास्थळाच्या जवळून एक बस लाइट ऑफ करून जाताना दिसली. नंबरच्या आधारे, ही बस एका धार्मिक संस्थेची असून ती बरौला गावाचा रहिवासी असलेला 34 वर्षीय मोनू सोलंकी नावाची व्यक्ती चालवत होती.
पोलिसांनी आरोपीला केली अटक
पोलिसांचं पथक मोनूच्या घरी चौकशीसाठी पोहोचलं. त्यावेळी घरात त्याची आई, पत्नी आणि पाच मुलं होती. मात्र, मोनू घरात नव्हता. त्या पाच मुलांपैकी दोन मुले ही मृत महिलेची होती. त्यांनीच आपली आई बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी, पोलिसांनी मृत महिलेची जोडवी त्यांना दाखवली आणि त्यांनी ती जोडवी आपली आई प्रीतीची असल्याचं सांगितलं. आरोपी तरुणाचा शोध घेतला असता पोलिसांनी त्याला शुक्रवारी त्याच्या घरातून अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपीने पीडित प्रीतीची बसमध्येच हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारजवळ महिलेची मान, तिचे दोन्ही हात, कपडे आणि धारदार शस्त्रे जप्त केली. कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवलं.
हे ही वाचा: भाजपची नवखी उमेदवार मैथिली ठाकूर बनली आमदार, दिग्गज नेत्याला चारली धूळ
ब्लॅकमेल करत असल्याने हत्या
घटनेतील आरोपी मोनू ज्या फॅक्टरीमध्ये काम करत होता, त्याच फॅक्टरीमध्ये मृत महिला प्रीती सुद्धा काम करत होती. दोन वर्षांपूर्वी फॅक्टरी बंद झाल्यानंतर, प्रीतीचं मोनूच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. यादरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेची दोन लग्न झाली होती, मात्र दोन्ही पतींनी तिला सोडून दिलं. त्यामुळे, प्रीती सतत मोनूला ब्लॅकमेल करत असल्याचं आरोपीने सांगितलं. इतकेच नव्हे तर, पीडितेने मोनूच्या दोन्ही मुलींकडून अनैतिक कामे करून घेण्याची धमकी दिल्याचं देखील त्याने सांगितलं. त्यानंतर, मोनूने प्रेयसीची हत्या करण्याचं ठरवलं.










