अलीनगर मतदारसंघाचा निकाल LIVE: भाजपची उमेदवार मैथिली ठाकूर आघाडीवर

मुंबई तक

Maithili Thakur Election Result LIVE: बिहारमधील अलीनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार मैथिली ठाकूर हिच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. जाणून घ्या या मतदारसंघाच्या निकालाचे लाइव्ह अपडेट.

ADVERTISEMENT

will bjp candidate maithili thakur win or lose see results of alinagar constituency bihar vidhansabha election result 2025
Maithili Thakur
social share
google news

Maithili Thakur Election Result: अलीनगर: बिहार विधानसभा 2025 च्या निवडणुकीचा निकाल आज (14 नोव्हेंबर) आज जाहीर होत आहे. यावेळी, बिहारमधील 243 जागांपैकी, दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंग हा सर्वात जास्त लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघाच्या निकालाकडे केवळ बिहारचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण या मतदारसंघातून भाजपने प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर हिला तिकीट देऊ केलं आहे. भाजपचा हा निर्णय कितपत योग्य ठरतो हे येत्या काही वेळातच समजेल.

अलीनगर मतदारसंघात मैथिली ठाकूरचा सामना हा राजदचे विनोद मिश्रा आणि जन सूरजचे विप्लव चौधरी यांच्याशी असणार आहे. मैथिली ठाकूरचा विजय सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी स्वतः निवडणूक रॅली काढली होती.

मैथिली ठाकूरच्या निवडणूक निकालाचे Live अपडेट

  • तासभराच्या मतमोजणीनंतर देखील मैथिली ठाकूर ही आघाडीवर आहे
  • पोस्टल मतमोजणी दरम्यान अलीनगर मतदारसंघातून भाजपची उमेदवार मैथिली ठाकूर आघाडीवर
  • पोस्टल मतमोजणीला झाली सुरुवात
  • अलीनगर मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात

हे ही वाचा>> बिहार विधानसभा निवडणुकीबाबत सट्टा बाजारात भलताच अंदाज, भाजपच्या अडचणी वाढणार.. गेम फिरणार?

Exit Poll मध्ये मैथिली ठाकूरचा पराभव होईल असा अंदाज

दरम्यान, मतदाननंतर जे Exit Poll पोल समोर आले त्याने मैथिली ठाकूरची चिंता मात्र वाढली आहे. कारण अनेक एक्झिट पोलनुसार, लोकगायिका आणि भाजपची उमदेवार असलेली मैथिली ठाकूर हिला पराभवाचा झटका सहन करावा लागू शकतो.

Exit Poll नुसार अलीनगरमध्ये यंदा मोठा फेरबदल होईल आणि ही जागा राजदच्या खात्यात जाईल. येथून विनोद मिश्रा हे निवडणूक जिंकू शकतात. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळीचा मुद्दा असा की, या मतदारसंघात जनसुराज पक्ष हा भाजपला त्रासदायक ठरत असल्याचं दिसतं आहे. यामुळे विनोद  मिश्रा ही जागा काढतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp