रोहित शर्माचा धमाका! IPL एलिमिनेटरमध्ये विक्रमांचा पाऊस..'असा' Record करणारा एकमेव फलंदाज!

Rohit Sharma New Record In IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटरच्या आजचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला.

Rohit Sharma Latest News

Rohit Sharma Latest News

मुंबई तक

• 10:33 PM • 30 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोहित शर्माने केली धडाकेबाज फलंदाजी

point

गुजरातच्या गोलंदाजांना ठोकले गगनचुंबी षटकार

point

रोहित शर्माने या सामन्यात केले नवे विक्रम

Rohit Sharma New Record In IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटरच्या आजचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला. मुंबईचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने 50 चेंडूत 81 धावा केल्या. यामध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. रोहित प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 

हे वाचलं का?

गेलच्या क्लबमध्ये मिळाली एन्ट्री

रोहित शर्माने या सामन्यात फक्त 28 चेंडूत अर्धशतक ठोकलं. रोहितच्या आयपीएल करिअरची ही 47 वी फिफ्टी होती. रोहितने या इनिंगमध्ये आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. इतकच नाही तर रोहित शर्माने आयपीएलमध्ये 300 षटकारही पूर्ण केले. रोहित दिग्गज क्रिस गेलनंतर आयपीएलमध्ये 300 षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू बनला आहे. क्रिस गेलने आयपीएलमध्ये 357 षटकार मारले आहेत.

हे ही वाचा >> Jalinder supekar Transfer: वैष्णवी हगवणेचे मामे सासरे जालिंदर सुपेकरांना मोठा दणका, पोलीस महानिरिक्षकांना पुण्यातून थेट पाठवलं 'इथे'!

रोहित शर्माने त्याच्या 266 व्या आयपीएलच्या इनिंगमध्ये 7000 धावाही पूर्ण केल्या आहेत. रोहित आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. तर विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत 266 सामन्यात 39.53 च्या सरासरीनं 8618 धावा केल्या आहेत. याचदरम्यान कोलहीच्या नावावर 8 शतक आणि 63 अर्धशतक आहेत. 

IPL प्ले ऑफ पॉवर प्ले मध्ये बेस्ट स्कोअर

100/2 - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, मुंबई वानखेडे, 2014 क्वालिफायर 2
84/1 डेक्कन चार्जर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सेंच्युरियन, 2009 सेमीफायनल
79-0 मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुल्लांपूर, 2025 एलिमिनेटर 

हे ही वाचा >> VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीची हत्या, माजी BJP नेत्याचा मुलाला जन्मठेप

गुजरात टायटन्स प्लेईंग 11 :  शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर. साई किशोर, गेराल्ड कोएट्जी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

मुंबई इंडियन्स प्लेईंग 11: रोहित शर्मा, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सेंटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन 

    follow whatsapp