गर्लफ्रेंडसोबत अश्लील व्हिडीओ बनवून बायकोला दाखवला! नंतर घडलं सर्वात भयंकर, पत्नीने थेट..

मुंबई तक

• 07:49 PM • 31 May 2025

Mainpuri Viral Video :  उत्तर प्रदेशच्या मॅनपूरी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडलीय. भाजपच्या माजी महिला नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Mainpuri Scandal Viral Video

Mainpuri Scandal Viral Video

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शुभमचा पत्नीसोबत भांडण झाल्यावर घडला धक्कादायक प्रकार

point

शुभमचे 130 व्हिडीओ झाले व्हायरल?

point

पत्नीने शुभमवर केले गंभीर आरोप

Mainpuri Viral Video :  उत्तर प्रदेशच्या मॅनपूरी जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडलीय. भाजपच्या माजी महिला नेत्या सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ताचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणात शुभम गुप्ताची पत्नी शीतलने खूप गंभीर आरोप लावले आहेत. शीतलने शुभमवर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या छळ केल्याचा आरोप लावून तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

दुसरीकडे शुभम गुप्ताचे जे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेनंही एफआयआर दाखल केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मॅनपूरीमध्ये भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या माजी नगर अध्यक्षा सीमा गुप्तांचा मुलगा शुभम गुप्ता यांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. 130 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, असा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ खूप अश्लील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओ वेगवेगळ्या जागेवर बनवण्यात आला आहे. 

हे ही वाचा >> मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, 'हिंदी आमची लाडकी...'

शुभमचा पत्नीसोबत व्हायचा वादविवाद

मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये शुभम गुप्ताचं लग्न शीतलसोबत झालं. पत्नी शीतल गुप्ताने पती शुभम गुप्तावर गंभीर आरोप लावले आहेत. शुभम त्याच्या प्रेयसीचे व्हिडीओ बनवून तिला दाखवतो आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. शुभम धमकी देतो की, माझी आई भाजप नेता आहे. मोठ्या नेत्यांसोबत तिची ओळख आहे. माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. जे हवं ते करेन. शुभमने मला (पत्नीला) घरात बंद करून उपाशी ठेवल्याचा आरोपही त्याच्या पत्नीने केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पती शुभम गुप्ता आणि सासू सीमा गुप्तासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडीओत जी महिला दिसत आहे, तिने शुभमची पत्नी शीतलसह 3 जणांविरोधात एफाआयआर दाखल केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रतिमा खराब झाली आहे, असा आरोप या महिलेनं केला आहे. 

हे ही वाचा >> टेन्शन वाढलं! 24 तासात 7 जणांचा मृत्यू, 2700 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात एका दिवसातच...