आधी धक्का दिला..नंतर हेल्मेट खेचलं! मैदानावरच खेळाडूंमध्ये झाली कुटाकुटी..Video तुफान व्हायरल

Cricketers Fight Viral Video : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या एमर्जिंग संघांमध्ये ढाकाच्या मैदानात चार दिवसीय सामना रंगला. पण या सामन्यात खेळाडूंमध्ये वादविवाद झाल्याने मैदानावरच तुफान राडा झाला.

Cricketers Fight Video Viral

Cricketers Fight Video Viral

मुंबई तक

• 05:52 PM • 30 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

या दोन संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानातच झाला राडा

point

आधी बाचाबाची झाली...नंतर एकमेकांना धक्का दिला आणि..

point

त्या सामन्यादरम्यान नेमकं घडलं तरी काय?

Cricketers Fight Viral Video : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या एमर्जिंग संघांमध्ये ढाकाच्या मैदानात चार दिवसीय सामना रंगला. पण या सामन्यात खेळाडूंमध्ये वादविवाद झाल्याने मैदानावरच तुफान राडा झाला. वाद इतका वाढला की, खेळाडूंनी एकमेकांवर हातही उचलला. बांगलादेशचा खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर खेळाडूंनी हाणामारीही केली. त्यानंतर अंपायरने खेळाडूंना समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही खेळाडूंमध्ये वाद होतच राहिला. 

हे वाचलं का?

बांगलादेशचा 22 वर्षीय फलंदाज रिपोन मंडल आणि दक्षिण आफ्रिकेचा 29 वर्षीय गोलंदाज शेपो एंतुली यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि दोघेही एकमेकांना भिडले. पण या प्रकरणावर कोणतीही ऑफिशियल अॅक्शन घेण्यात आली नाही. अंपायर लवकरच याप्रकरणावर त्यांचा रिपोर्ट देऊ शकतात. खेळाडूंच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

हे ही वाचा >> मोठी बातमी! निलेश चव्हाणला अखेर नेपाळ बॉर्डरवरून अटक

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जेव्हा फलंदाज रिपोनने एंतुलीच्या चेंडूवर थेट षटकार ठाकला, त्यानंतर रिपोन त्याचा सहकारी फलंदाज मेहदी हसनकडे जात होता, तेव्हा ही घटना घडली. रिपोन आणि एंतुली एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा एंतुली रागाच्या भरात रिपोनवर धावला. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना ढकललं. त्यानंतर एंतुलीने रिपोनचा हेल्मेट खेचला. अंपायरने खेळाडूंना समजावण्याचा प्रयत्न केला.

पण एंतुलीने पुन्हा एकदा हेल्मेट खेचला. त्यानंतर अंपायरने दोन्ही खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. मैदानात उभे असलेले दक्षिण आफ्रिकेच्या एमर्जिंग टीमचे खेळाडूही एंतुलीला रोखू शकले नाहीत. या प्रकरणावर समालोचकांनीही कमेंट्स दिल्या. ऑन एअर कमेंटेटर नाबिल कायजरने म्हटलं, हे तर खूप जास्तच झालं. हे स्वीकारार्ह नाहीय. आम्ही नेहमी क्रिकेटच्या मैदानात बाचाबाची झाल्याचं पाहतो. पण अशाप्रकारचं भांडण आम्ही याआधी पाहिलं नाही. 

हे ही वाचा >> पुतण्याचे काकीसोबत शारीरिक संबंध, निळ्या ड्रमला घाबरून पतीने घेतला भलताच निर्णय!

    follow whatsapp