पतीला बांधून ठेवलं..पत्नीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप! रस्सी सुटताच घडलं भयंकर..

मुंबई तक

• 03:20 PM • 31 May 2025

Woman Gangrape Crime News : झारखंडच्या बोकारोमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील सेक्टर-12 परिसरात 4 नराधमांनी पती-पत्नीला जबरदस्ती दारू पाजली.

प्रतीकात्मक चित्र

प्रतीकात्मक चित्र

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीसमोरच नराधमांनी महिलेवर केला गँगरेप!

point

पतीला दोरीने बांधलं आणि पत्नीला दारू पाजून...

point

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं?

Woman Gangrape Crime News : झारखंडच्या बोकारोमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील सेक्टर-12 परिसरात 4 नराधमांनी पती-पत्नीला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर या आरोपींनी पतीला बांधून ठेवलं. त्यानंतर पतीसमोरच या नराधमांनी पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत चार ऑटो चालक आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. पीडिता धनबादच्या मधुबन येथील रहिवासी आहे. पती-पत्नी दुंदीबाग मार्केटहून भाज्या खरेदी करून निर्माणाधीन बिल्डिंगजवळ जात होते. त्याचदरम्या सेक्टर ए शाळेजवळ चार जणांनी दाम्पत्याला घेरलं. त्यानंतर आरोपींनी पती-पत्नीला शाळेच्या परिसरात नेलं आणि हातपाय बांधून पत्नीला मारहाण केली. तसच पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत त्यांना दारूही पाजली.

हे ही वाचा >> 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काय घडलं?

त्यानंतर या नराधमांनी पतीसमोरच पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणाहून सर्व आरोपी फरार झाले. घटना घडल्यानंतर आरोपींनी पतीला ज्या दोरीनं बांधलं होतं, ती दोरी सोडली. त्यानंतर रस्त्यावर येत मदतीची हाक मारू लागले. पोलिसांना याप्रकरणाची खबर मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक त्यांच्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर महिला आणि पतीला रुग्णालयात दाखल केलं.

पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर गँगरेप झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी दिलीप कुमार, अजय कुमार, जय कुमार आणि अन्य एकावर अटकेची कारवाई केली. अटक केलेले संशयित आरोपी ऑटो चालक आहेत. 

हे ही वाचा >> बंदुकीचा नाद जीवावर बेतला! मुलानं खेळता खेळता गोळी फायर केली अन् भावाला लागली, 20 वर्षीय मुलगा...

रिपोर्टनुसार, पती-पत्नी रुग्णालयातील बिल्डिंगच्या बांधकामासाठी मजुरीचं काम करतात. याप्रकरणाबाबत माहिती देताना सिटी डिएसपी अलोक रंज म्हणाले, बोकारा शहराच्या सेक्टर 12 मध्ये गँगरेपची घटना घडली. संशयित चार तरुणींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.