सातारा : दगडाने ठेचून ऊसतोड मजूराचा खून केला, अन् जरंडेश्वर कारखान्यात कामाला असलेल्या आरोपीनं विष प्यायलं

Satara Crime : सातारा जिल्ह्यतील कोरेगाव परिसरात ऊसतोड मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त उघडकीस आलं आहे. जरंडेश्वर साखर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने हा खून केल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं. यानंतर कोरेगाव पोलिसांन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

satara crime

satara crime

मुंबई तक

21 Jan 2026 (अपडेटेड: 21 Jan 2026, 05:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजयने मच्छिंद्रला शेतात नेत पाय बांधून दगडाने ठेचले

point

राजेंद्र माने शेतात गेले असता मृतदेह आढळला

point

हादरवून टाकणारी घटना

Satara Crime : सातारा जिल्ह्यतील कोरेगाव परिसरात ऊसतोड मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त उघडकीस आलं आहे. जरंडेश्वर साखर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने हा खून केल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं. यानंतर कोरेगाव पोलिसांन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मच्छिंद्र अंबादास भोसे (वय 42) असे मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी गोरखनाथ अंबादास भोसे यांनी फिर्याद दिली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : केडीएमसी महापालिकेत ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, बंद दाराआड राजकीय खलबतं

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र भोसे हे गेल्या काही वर्षांपासून उसाचा हंगाम सुरु झाल्यानंतर जरंडेश्वर कारखान्यात कामासाठी जात होते. ऊस पिकाच्याच हंगामात पत्नी व कुटुंबासह बीडहून चिमणगाव, ता. कोरेगाव येथे ते आले होते. या प्रकरणातील संशयित अदय माने हा जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून काम करत होता. 

अजयने मच्छिंद्रला शेतात नेत पाय बांधून दगडाने ठेचले

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, अजय माने यांनी मच्छिंद्र भोसे यांना जेवणासाठी जात असल्याचं सांगून शेतात नेले. नंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचा संशय आहे. अजयने मच्छिंद्रचे पाय बांधून दगडाने ठेचले, नंतर त्याला कोरेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मच्छिंद्र भोसे हे घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने कोरेगाव पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

राजेंद्र माने शेतात गेले असता मृतदेह आढळला 

दरम्यान, पोलिसांनी शोध सुरु केला असता, मंगळवारी सकाळी अजयचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता, तेथे मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केल्यानंतर मंगळवारी सकाळी अजयचे वडील राजेंद्र माने शेतात गेले असता तेथे मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. पोलिसांनी शोध घेत चक्र फिरवली असता, अजय मानेवर संशयाची पाल चुकचुकल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करत शोध घेतला.  

हे ही वाचा : नाश्ता करताना मित्राच्या प्लेटमध्ये हात धुण्यावरून वाद, नंतर बेदम मारहाण करत संपवलं

सध्या आरोपीवर उपचार सुरु असून या हत्येमागील कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेची माहिती जरंडेश्वर शुगर मिल परिसरासह बीड जिल्ह्यात वेगाने पसरल्याचं वृत्त आहे. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी कोरेगाव धाव घेतली. परिस्थिती लक्षात घेता कारखाना परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

    follow whatsapp