कणकवली : ईश्वरी राणे आणि सोहमची तरंदळे धरणात उडी मारुन आत्महत्या; WhatsApp चॅटनंतर टोकाचा निर्णय

Sindhudurg Crime : सोहम हा कणकवली महाविद्यालयात वाणिज्य तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता, तर ईश्वरी कनेडी महाविद्यालयात बारावी शिक्षण घेत होती. दोघेही एकाच क्षेत्रात राहिल्याने आणि एकमेकांना बराच काळ ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.

Sindhudurg Crime News

Sindhudurg Crime News

मुंबई तक

11 Dec 2025 (अपडेटेड: 11 Dec 2025, 02:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कणकवली : ईश्वरी राणे आणि सोहमची तरंदळे धरणात उडी मारुन आत्महत्या

point

WhatsApp चॅटनंतर टोकाचा निर्णय

Sindhudurg Crime News : कणकवली तालुक्यातील तरंदळे धरण परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मंगळवारी उशिरा रात्री सोहम कृष्णा चिंदरकर (वय 22, रा. कलमठ-कुंभारवाडी) आणि ईश्वरी दीपक राणे (18, रा. कणकवली-बांधकरवाडी) या दोन तरुण विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. रात्री उशिरा आढळलेले दोघांचे मृतदेह पाहून स्थानिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत या दुहेरी आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नव्हते.

हे वाचलं का?

सोहम हा कणकवली महाविद्यालयात वाणिज्य तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता, तर ईश्वरी कनेडी महाविद्यालयात बारावी शिक्षण घेत होती. दोघेही एकाच क्षेत्रात राहिल्याने आणि एकमेकांना बराच काळ ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी रात्री सोहम घरी परतला नसल्याने कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध सुरु केला. अनेक ठिकाणी चौकशी करूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दुसरीकडे, ईश्वरीदेखील सायंकाळपासून घरी परतली नव्हती. दोघेही घराबाहेर असल्याचे लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांत चिंता निर्माण झाली. शोधमोहीम सुरु असतानाच तरंदळे धरण परिसरात दोन मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : बीड : सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांची बनावट सही केली, नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल

रात्री अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास धरणात दोन तरुणांचे मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर पोलिसांना त्वरित कळविण्यात आले. त्यानंतर तपासात मृतदेहांची ओळख सोहम आणि ईश्वरी अशी पटली. एकाच वेळी धरणात उडी घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून दोन्ही कुटुंबीयांकडून माहिती घेतली. दरम्यानच्या तपासात सोहम आणि ईश्वरी यांच्यात व्हॉट्सअॅपवर बराच काळ संवाद होत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या चॅटिंगचा तपशील आणि त्यातून आत्महत्येचे काही धागेदोरे मिळू शकतात का, याची तपासणी सुरू आहे.

या घटनेने कणकवली तालुका शोकसागरात बुडाला असून दोन तरुण जीवांचा मृत्यू स्थानिक समाजासाठी मोठा धक्का ठरला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लव्ह ट्रँगलमधून प्रियकराची निर्घृण हत्या! चाकू आणि सर्जिकल ब्लेडने वार अन्... नेमकं प्रकरण काय?

    follow whatsapp