Solapur Accident : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे, काही दिवसांपूर्वी पुण्यात भीषण अपघात झाला होता ज्यात तिघांनी आपला जीव गमावला होता. याच घटनेनंतर आता सोलापूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. धडक दिलेल्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे, ज्यात तिघांचाही अंत झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून शोक व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अडीच वर्षांच्या लेकीसोबत वडिलांचे अश्लील चाळे, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केला... पुढे काय घडलं?
सोलापुरात दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा दुर्दैवी अंत
सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात 16 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने दुचाकीला जोरदार धडक दिली, या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणांची नावे समोर आली आहे. नागेश प्रकाश गवंडी (वय 25, रा. रविवार पेठ), रोहन कोरे (वय24, रा. धोत्रीकर वस्ती) आणि प्रज्वल चनशेट्टी (वय 25, रा. शेळगी) अशी तरुणांची नावे आहेत.
हे ही वाचा : ट्रक ड्रायव्हर नवऱ्यासोबत त्याचा दोस्त घरी यायचा, बायको प्रेमात पडली,...मोठं कांड केलं, प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले
अपघातानंतर वाहनचालक फरार
तिघेही तरुण दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनं शहरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











