सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली, अन् सर्वांची झोप उडाली

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका लोकप्रिय रीलस्टार विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Solapur Crime News

Solapur Crime News

मुंबई तक

27 May 2026 (अपडेटेड: 27 May 2026, 02:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली

point

अन् सर्वांची झोप उडाली; नेमकं काय घडलं?

Solapur Crime News :  सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे एका विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. लोकप्रिय रीलस्टार  असलेल्या या विवाहितेने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यासह सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : विधान परिषद निवडणूक : महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?

स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन केली आत्महत्या 

रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) असं आत्महत्या केलेल्या रीलस्टार विवाहितेचं नाव आहे. दरम्यान, तिने टोकाचे पाऊल कशामुळे उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहिणी ही ब्रह्मपुरी येथील स्वत:च्या “हॉटेल ग्रामपंचायत”च्या स्वयंपाकघरात गेली होती. तिला पत्र्याच्या स्वयंपाक खोलीत लोखंडी अँगल दिसला होती. त्याच अँगलला तिने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : Astrology : आजच्या दिवशी 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या राशीभविष्य

इन्स्टाग्रामवर मिळवली होती लोकप्रियता 

रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक विषय, विनोदी व्हिडीओ तसेच खाद्यपदार्थांवरील रील्समुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय सुरू केला होता.

व्यवसाय स्थिरावत असतानाच आणि नवीन शाखांच्या तयारीत असतानाच रोहिणी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेनंतर पती निलेश यांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सोशल मीडिया क्षेत्रासह मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.