Starlink India Launch : एलॉन मस्क यांचं स्टारलिंक (Starlink) काही काळापासून भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. आता स्टारलिंकने भारतीय टेलिकॉम एअरटेलसोबत पार्टनरशिप केली आहे. या माध्यमातून स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटला भारतात लॉन्च केलं जाणार आहे. दरम्यान, अजूनही स्पेसएक्सला भारतीय अधिकाऱ्यांकडून परवाना मिळणं बाकी आहे. कारण विनापरवाना असलेली कंपनी भारतात सर्व्हिस देऊ शकत नाही. एअरटेलने प्रेस रिलीज जारी करून माहिती दिलीय की, स्पेसएक्ससोबत कंपनीने करार केला आहे.
ADVERTISEMENT
भारतात स्टारलिंक आल्यावर एअरटेलच्या माध्यमातून इथे स्टारलिंकचे इक्विपमेंट्स विकले जाऊ शकतात. या पार्टनरशिपमुळे दोन्ही कंपन्यांना फायदा होणार आहे. कारण एअरटेल स्टारलिंकचा इन्फ्रास्ट्रक्चर वापरू शकेल, तर स्टारलिंकसाठी भारतात एक्सपेन्शन सोपं होईल. एअरटेलमध्ये सध्या असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा स्टारलिंकलाही मिळेल.
हे ही वाचा >> Tushar Kharat : भाजप मंत्री जयकुमार गोरेंना बिनधास्त नडलेले पत्रकार तुषार खरात कोण?
एलन मस्क यांचं स्टारलिंक जगभरात खूप लोकप्रिय होत आहे. हे ट्रॅडिशनल फायबर ऑप्टिक्सपासून वेगळं आहे. कारण इथे इंटरनेट सॅटेलाईटच्या माध्यमातून डायरेक्ट मिळतं. यासाठी छतावर कंपनीचा अँटीना लावावा लागतो. जे स्टारलिंकच्या सॅटेलाईटने कनेक्ट होतं. स्टारलिंकचे सॅटेलाईट इतर सॅटेलाईटच्या तुलनेत खूप खाली असतात.
यामुळे कनेक्टिव्हिटी वेगवान होते. विशेष म्हणजे विमानातही स्टारलिंकचं इंटरनेट खूप वेगाने काम करतं. एअरटेल मॅनेजिंग डायरेक्टर आणि व्हाईच चेअरमेन गोपाळ वित्तल यांनी म्हटलं की, भारतात नेक्स जनरेशन सॅटेलाईट इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी स्पेसएक्ससोबत जोडणं मोठं माईलस्टोन आहे.
हे ही वाचा >> Beed Crime: 'Walmik Karad ने एकदा नव्हे तर 6 वेळा...' धक्कादायक माहिती आली समोर, 'तो' जबाब जसाच्या तसा...
Starlink चा काय होईल फायदा?
स्टारलिंक भारतात आल्यानंतर रिमोट एरियाला याचा जास्त फायदा होईल. कारण तिथे फायबर ऑप्टिक्स पोहचत नाहीत. जिथे आधीच फायबर इंटरनेट आहे. तिथे सुरुवातीला स्टारलिंकचं खास महत्व राहणार नाही. कारण फायबर केबलच्या माध्यमातून आधीपासूनच फास्ट इंटरनेट मिळत आहे.
ADVERTISEMENT
