तरुणांना LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, झटपट भरा फॉर्म, 'ही' आहे शेवटची तारीख

LIC कडून हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिससाठी मोठी भरती करण्यात आली आहे. ही अप्रेंटिसशिप एक वर्ष कालावधीसाठी असेल.

LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कधीपर्यंत कराल अर्ज?

LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कधीपर्यंत कराल अर्ज?

मुंबई तक

17 Jun 2025 (अपडेटेड: 17 Jun 2025, 12:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

LIC मध्ये नोकरीची मोठी संधी

point

LIC हाउसिंग फायनान्समध्ये अप्रेंटिससाठी भरती

point

काय आहे अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता?

Job Vacancy: ग्रॅज्युएशनची डिग्री असलेले बरेच तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. LIC कडून हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिससाठी मोठी भरती करण्यात आली आहे. ही अप्रेंटिसशिप एक वर्ष कालावधीसाठी असेल. तसेच, यामध्ये निवड झालेल्या तरुणांना दर महिन्याला चांगलं स्टायपेंड मिळेल. 

हे वाचलं का?

या भरतीच्या माध्यमातून सुमारे 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया आणि पात्रता, सविस्तर जाणून घ्या. 

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशनची डिग्री असेल, ते तरुण या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असतील. 

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 20 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

हे ही वाचा: मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया विमानात बिघाड, डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर कोलकातामध्येच...

अर्ज करण्यासाठी शुल्क

अर्ज करण्यासाठी प्रवर्गानुसार शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. जनरल (Open)/ ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 944 रुपये शुल्क तसेच एससी (SC)/ एसटी (ST) उमेदवारांना 708 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, PwBD प्रवर्गातील उमेदवारांना 472 रुपये शुल्क  आकारण्यात येईल. 

निवड प्रक्रिया

उमेदवारांची नियुक्ती तीन टप्प्यांमध्ये करण्यात येईल. यासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा (3 जुलै 2025 रोजी प्रस्तावित) घेण्यात येईल. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर पर्सनल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून निवड केली जाईल. 

हे ही वाचा: गिझर लिक झालं, नवविवाहित दाम्पत्याचा गुदमरून अंत? फोन लागत नाही म्हणून कुटुंबीय घरी आले तर...

कसा कराल अर्ज? 

  • सर्वप्रथम LIC HFL या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • वेबसाइटच्या टॉप मेन्यू बारमध्ये दिलेल्या 'Careers' टॅबवर क्लिक करा. 
  • त्यानंतर 'Apply Online' लिंकवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करुन अर्ज भरा. 
  • त्यानंतर दिल्या गेलेल्या निर्देशनाप्रमाणे आवश्यक डॉक्यूमेंट्स (फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्र, इ.) अपलोड करा. 
  • ऑनलाइन माध्यमातून आपल्या प्रवर्गानुसार अर्जाचे शुल्क भरा. 
  • त्यानंतर शेवटी फॉर्ममध्ये भरलेली माहिती तपासून घ्या आणि नंतर Submit बटणावर क्लिक करा. 
  • अर्जाची प्रिंटआउट काढून स्वत:कडे सुरक्षितरित्या ठेवा.

 

    follow whatsapp