ठाणे : कन्स्ट्रक्शन साईटवर 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, 45 वर्षीय मजूराचे कृत्य

मुंबई तक

• 01:15 PM • 07 Apr 2026

माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर येत आहे. ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या 45 वर्षीय मजूराने 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

Thane Crime

Thane Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाणे : कन्स्ट्रक्शन साईटवर 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

point

45 वर्षीय मजूराचे कृत्य

Thane Crime : ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवर सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. त्या साईटवर काम करणाऱ्या एका मजूरानेच हे कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मजूराला काही तासामध्येच अटक केली आहे. 

हे वाचलं का?

45 वर्षीय मजूराला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (6 एप्रिल) रात्री ठाण्यातील नौपाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी 45 वर्षीय मजूराला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीचे आई-वडील ज्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतात, तिथेच हा आरोपी काम करतो. त्यामुळे आरोपीची आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांची चांगली ओळख आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, लग्नाच्या वरातीत दोन खून, बाप-लेकाची निर्घृण हत्या; नेमकं कारण काय?

 

बाजूला नेऊन लैंगिक अत्याचार

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मजूर पीडित मुलीला फसवून एका बाजूला घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे घाबरुन गेलेल्या मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तातडीने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : कोविड लॉकडाऊनमध्ये दुकान उघडं ठेवल्याने अटक, पोलीस कोठडीत बाप-लेकाचा जीव घेतला; 9 पोलिसांना फाशीची शिक्षा

 

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. काही तासांमध्येच आरोपीला शोधून अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (1) आणि 65 (2) सह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आरोपीची चौकशी सुरु झाली असून अधिक तपास सुरु आहे.