Video : बैल नाही तो..वाघ आहे वाघ! भारतीय टूरिस्टवर Tiger ने केला खतरनाक हल्ला..'ती' चूक नडली

मुंबई तक

• 10:35 PM • 02 Jun 2025

Phuket Tiger Attack Video Viral : बँकॉकमधील फुकेतच्या टायगर किंगडममध्ये वाघाने एका भारतीय टूरिस्टवर जीवघेणा हल्ला केला. वाघासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्न करत असताना, वाघाने अचानक या तरुणावर पंजा मारला.

Tiger Attack Viral Video

Tiger Attack Viral Video

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाघाने भारतीय टुरिस्टवर केल प्राणघातक हल्ला

point

त्या चुकीमुळे वाघ चिडला आणि थेट हल्ला केला

point

वाघाच्या हल्ल्याच्या खतरनाक व्हिडीओ होतोय व्हायरल

Phuket Tiger Attack Video Viral : बँकॉकमधील फुकेतच्या टायगर किंगडममध्ये वाघाने एका भारतीय टूरिस्टवर जीवघेणा हल्ला केला. वाघासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्न करत असताना, वाघाने अचानक या तरुणावर पंजा मारला. हा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, टूरिस्ट हळूहळू वाघासोबत चालत असताना सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वाघाच्या पाठिवर हात फिरवत असताना त्या वाघाने या तरुणावर झेप घेतली आणि त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

एक्स यूजर सिद्धार्थ शुक्लाने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, टूरिस्टला किरकोळ जखम झाली आहे. तो सुरक्षित आहे. वाघाच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लोकांनी प्राण्यांसोबत योग्य पद्धतीने वागावं, अशा प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, प्राणी प्राणीच असतात. त्यांच्या दयेची अपेक्षा ठेऊ नका. ते बदला घेणारच.

हे ही वाचा >> अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली, आतून आला जोरदार आवाज अन्...

अन्य एकाने म्हटलं, अशा धोकादायक स्टंट्सपासून सावध राहा.अशाप्रकारचं कृत्य जीवघेणं ठरू शकतं, असंही एकाने म्हटलं. एका यूजरने असंही म्हटलं, प्राण्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे आणि त्यांच्यापासून सतर्क राहिलं पाहिजे. काही लोकांनी कमेंट करत म्हटलं, टूरिस्टच्या अशा वागणुकीमुळे वाघाला राग आणि त्याने या टूरिस्टवर हल्ला केला. वाघाला पाठीच्या भागावर हात लावणं आवडत नाही, म्हणून ते रागावतात, असंही एका यूजरने म्हटलं. 

फुकेतमध्ये प्राण्यांना देतात क्रूर वागणूक

थायलंडच्या फुकेतमध्ये टायगर किंगडम केंद्रावर अनेक दिवसांपासून टीका होत आहे. कारण येथे येणाऱ्या पर्यटकांना वाघांसोबत बिंधास्त फिरण्याची मुभा दिली जाते. कारण येथील लोक पर्यटकांकडून प्राण्यांसोबत फोटो काढण्याचे पैसे घेतात. पण काही लोकांनी या केंद्रावर जोरदार टीका केली आहे. पर्यटकांचा जीवन धोक्यात टाकून पैसा कमावतात, असं काही लोकांचं म्हणणं आहे.