Chandrapur : पाणी भरायला गेलेलेल्या वाघाचा हल्ला, शेतकरी रक्तबंबाळ अवस्थेत विहिरीत उतरला अन्...

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंग हे सकाळी आपल्या भातशेतीला पिकाला पाणी भरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाच्या निशाण्यावर आले.

Mumbai Tak

मुंबई तक

17 Mar 2025 (अपडेटेड: 17 Mar 2025, 02:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दबा धरून बसलेल्या वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला

point

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी रक्तबंबाळ झाला

point

शेतकरी थेट वाघाशी भिडला आणि विहिरीत उतरला

Chandrapur Tiger Attack : गेल्या काही वर्षांमध्ये हिंस्त्र श्वापदांचं मानवी वस्त्यांजवळ येणं वाढल्याचं दिसतं.अशातून अनेकदा मानव आणि हिंस्त्र श्वापदांमध्ये संघर्ष झाल्याच्या घटना समोर येतायत. मात्र, चंद्रपूरमध्ये घडलेली घटना थोडी वेगळी आहे. चंद्रपूरमध्ये एक शेतकरी थेट वाघाला भिडला आणि आपल्या सहकाऱ्याला वाचवलं.या घटनेत तो शेतकरी जखमी झाला. पांडुरंग डांगे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.चंद्रपूरच्या नांदगाव जानीमध्ये ही घटना घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Latur: 'हा' हायवे नाही तर मृत्यूचं द्वार आहे, तीन प्रचंड मोठे अपघात अन्...

पांडुरंग हे सकाळी आपल्या भातशेतीला पिकाला पाणी भरत असताना दबा धरून बसलेल्या वाघाच्या निशाण्यावर आले. पांडुरंग यांना वाघापासून दूर पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. वाघानं हल्ला केला आणि पांडुरंग रक्तबंबाळ झाले. मात्र हिंमत न हारता ते थेट वाघाला भिडले.

शक्ती कामी येणार नाही हे लक्षात आल्यावर पांडुरंग  यांनी संधी पाहून थेट शेतातील विहिरीत उतरले. विहिरीत उतरून त्यांनी आपल्या मुलाला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर पांडुरंग यांचा मुलगा गावकऱ्यांसोबत शेतात पोहोचला. लोकांची गर्दी आणि आवाज ऐकून वाघाने घटनास्थळावरून पळ काढला आणि शेतकऱ्याचा जीव वाचला.

हे ही वाचा >> प्रियकराने सोशल मीडियावर प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल, पण...

जखमी शेतकऱ्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वनविभागाचं पथकही या प्रकरणाच्या तपासात व्यस्त असून, वनविभागाचे अधिकारीही शेतकऱ्याची ही कहाणी ऐकून आश्चर्यचकित झाले.

    follow whatsapp