TV actress sanchita ugale dies by suicide : वसईतील नालासोपारा परिसरातून एक अतिशय दुर्दैवी बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत असलेल्या अभिनेत्री संचिता उगाले हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. संचिताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'मी भवानीला मारुन टाकलं', एक कॉल आला अन् बॉयफ्रेंडही बेशुद्ध अवस्थेत तिथेच सापडला
अभिनेत्रीने आत्महत्या कशामुळे केली? पोलिसांकडून होणार चौकशी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आचोले पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संचिताचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमसाठी (शवविच्छेदन) पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. संचिताने नक्की कोणत्या परिस्थितीमुळे किंवा मानसिक दबावामुळे हे पाऊल उचलले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस चौकशी करणार आहेत.
हेही वाचा : मातोश्रीवरील बैठकीतून बाहेर पडताच संजय दिना पाटलांचं मोठं वक्तव्य
संचिताच्या अकाली जाण्याने मनोरंजनसृष्टीत हळहळ
सचिंता उगाले ही हिंदी टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय चेहरा होती. इन्स्टाग्रामवर देखील तिचे 1 लाख 40 हजार फॉलोअर्स होते. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते, मात्र तिच्या अशा अकाली निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोरंजनसृष्टीतील तिच्या सहकाऱ्यांनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तरुण वयातच आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर कारकीर्द घडवत असलेल्या एका कलाकाराचा असा अंत होणे, ही बाब अत्यंत वेदनादायी आहे.
ADVERTISEMENT











