उल्हासनगर : गर्भवती महिला ट्रॅफिक जाममध्ये अडकली, रिक्षात दिला बाळाला जन्म

मिथिलेश गुप्ता

07 Oct 2026 (अपडेटेड: 07 Oct 2026, 09:01 AM)

Ulhasnagar traffic jam : उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्याने गर्भवती महिलेची रिक्षातच प्रसूती झाली. रुग्णालय काही अंतरावर असतानाही कोंडीमुळे वेळेत पोहोचता आले नाही.

Ulhasnagar traffic jam

Ulhasnagar traffic jam

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगर : गर्भवती महिला ट्रॅफिक जाममध्ये अडकली

point

रिक्षात दिला बाळाला जन्म

Ulhasnagar traffic jam : महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीमुळे गर्भवती महिलेची रिक्षात प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर हरिकला थापा यांना उपचारासाठी सरकारी सेंट्रल रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयाच्या दिशेने जात असताना त्यांची रिक्षा न्यू एरिया परिसरात वाहतूक कोंडीत अडकली. रुग्णालय काही अंतरावरच असतानाही रस्ता बंद असल्याने रिक्षा पुढे जाऊ शकली नाही. यादरम्यान महिलेच्या प्रसूतीच्या कळा वाढत गेल्या आणि अखेर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रिक्षेत महिलेची प्रसूती झाली.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: तुमच्या घरातील कोणत्या वस्तूंचा Insurance असायला हवा आणि कोणाचा नसावा?

मंगळवारी कॅम्प क्रमांक 3 मधील सेक्शन 20 परिसरात राहणाऱ्या हरिकला थापा यांना प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी सरकारी सेंट्रल रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तात्काळ दुसरे वाहन उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना रिक्षाने रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. रिक्षा न्यू एरिया परिसरात पोहोचताच ती मोठ्या वाहतूक कोंडीत अडकली. या कोंडीत रिक्षा सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून राहिली. या काळात महिलेच्या प्रसूतीच्या कळा वाढत होत्या. रुग्णालय जवळ असतानाही वाहतूक कोंडीमुळे रिक्षा पुढे सरकत नव्हती.

हेही वाचा : Personal Finance: तुमच्या घरातील कोणत्या वस्तूंचा Insurance असायला हवा आणि कोणाचा नसावा?

उल्हासनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा चर्चेत

अखेर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हरिकला थापा यांची रिक्षेत प्रसूती झाली. त्यांनी रिक्षेतच एका मुलाला जन्म दिला. वाहतूक कोंडीमुळे रुग्णालय काही अंतरावर असूनही वेळेत पोहोचता न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. उल्हासनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

या घटनेमुळे उल्हासनगर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. विशेषतः रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांसाठी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर ठरू शकते. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.