16 वर्षांच्या मेव्हणीवर जडला दाजींचा जीव, गरोदरही राहिली अन् घडली थरकाप उडवणारी घटना

मुलीच्या मेव्हण्याने तिला घाबरवून आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्यापासून ती गरोदर राहिल्यानंतर तिला बाळाचा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले.

16 वर्षांच्या मेव्हणीवर जडला दाजींचा जीव, गरोदरही राहिली अन्...

16 वर्षांच्या मेव्हणीवर जडला दाजींचा जीव, गरोदरही राहिली अन्...

मुंबई तक

• 01:48 PM • 20 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तरप्रदेशातील संतापजनक घटना

point

मेव्हणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत नको ते केलं...

point

तिला प्रेग्नंट केल्यानंतर...

UP News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर परिसरातील खेरी गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मेहुण्याने तिच्यासोबत नको ते संबंध बनवले. मुलीच्या मेव्हण्याने तिला घाबरवून आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर त्याच्यापासून ती गरोदर राहिल्यानंतर तिला बाळाचा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने मुलीला अॅसिड पाजले आणि त्यात तिची प्रकृती बिघडल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

मझगाई पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातून हा चीड आणणारा प्रकार घडला. या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या मोठ्या मुलीचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांनी तिच्या मुलीचं लग्न फूलबेहड पोलीस स्टेशन हद्दीतील सिसय्या पूरवा गावातील एका मुलाशी लावून दिलं होतं. पण गेल्या वर्षी तिची मोठी मुलगी आजारी पडली तेव्हा त्यांनी तिच्या धाकट्या मुलीला तिची काळजी घेण्यासाठी मोठ्या मुलीच्या घरी पाठवलं.

मेव्हणीसोबतच केलं घाणेरडं कृत्य

मात्र, त्यावेळी जावयाने त्या अल्पवयीन मुलीला धमकावून आणि घाबरवून तिच्यासोबत घाणेरडं कृत्य केलं. मुलगी तिथून परत तिच्या घरी आल्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी नेण्यात आलं. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचं अल्ट्रासाउंड रिपोर्टमधून समोर आलं. याबद्दल मुलीला विचारल्यानंतर तिच्या जीजूने तिच्यासोबत केलेल्या घाणेरड्या कृत्यांबद्दल तिने सांगितले.

हे ही वाचा: एकाच स्कार्फने दोघांनी जीवन संपवलं! ट्रकचालक रोहित आणि डी फार्म'च्या विद्यार्थीनीमध्ये काय घडलं?

त्यानंतर त्या मुलीचे वडिल त्यांच्या मोठ्या मुलीच्या सासरी गेले आणि त्यांच्या जावयाला याबद्दल जाब विचारला. सुरुवातीला जावयाने या सगळ्याला नकार दिला पण वडिलांनी पोलिसांची धमकी दिल्यानंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. 

दोन्ही कुटुंबांनी धाकट्या मुलीचं लग्न जावयाशी करुन देण्याचं ठरवलं. काही दिवसांनी, मोठ्या मुलीचा तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच जावयाशी वाद झाला आणि ती भांडण झाल्यावर माहेरी निघून आली. याच रागात जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी त्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला आणि नंतर तिला औषधाच्या नावाखाली अ‍ॅसिड पाजले.

हे ही वाचा: लग्न करायचं म्हणून गोव्याला गेले, वादानंतर प्रेयसीचा खून करुन जंगलात फेकलं, एका तिकीटामुळे बिंग कसं फुटलं?

यानंतर मुलीची तब्येत जास्त बिघडली. वडिलांनी याबद्दल विचारले असता तिच्यासोबत जावई आणि त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल कळालं. मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याचं आणि औषधाच्या नावाखाली तिला अॅसिड पाजण्यात आलं असल्याचं सांगितलं. याबद्दल वडिलांनी जावयाला विचारले असता त्याने मुलीवर योग्य उपचार केल्याचं आश्वासन दिलं. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी जावई आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.