भाजप जिल्हाध्यक्षानं महिलेला मारली मिठी! Video व्हायरल होताच म्हणाला, "तिनेही माझा हात.."

Bjp Politician Hugs Women Viral Video : उत्तर प्रदेशचा गोंडा जिल्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. कारण एका भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडीओमुळं खळबळ माजली आहे.

Bjp Politician Hugs Women Viral Video

Bjp Politician Hugs Women Viral Video

मुंबई तक

• 09:13 PM • 25 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या बड्या नेत्यानं महिलेला मारली मिठी..

point

त्या व्हायरल व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

point

नेमकं घडलं तरी काय? भाजप नेता म्हणाला..

Bjp Politician Hugs Women Viral Video : उत्तर प्रदेशचा गोंडा जिल्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. कारण एका भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडीओमुळं खळबळ माजली आहे. गोंडाचे भाजप जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बम-बम यांचा आहे. व्हिडीओत अमर किशोर कश्यप एक महिलेला अलिंगन घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द अमर किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, ज्या महिलेसोबत ते होते, ती पक्षाची कार्यकर्ता आहे. त्या महिलेला चक्कर आली होती. त्यामुळे मी तिला सपोर्ट दिला, असं किशोर यांचं म्हणणं आहे. 

हे वाचलं का?

भाजप नेता अमर किशोर कश्यप यांचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, जिल्ह्याच्या पार्टी कार्यालयात एक महिला पाठीवर बॅग घेऊन प्रवेश करते. त्यानंतर महिलेच्या मागे भगवा गमछा घालून अमर किशोर कश्यप येतात. त्यानंतर ते महिलेला अलिंगन करतात. याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

हे ही वाचा >> Navi Mumbai : पत्नी घटस्फोट द्यायला टाळाटाळ करायची..पतीने 6 लाखात हत्येची सुपारी दिली, नंतर घडलं भयंकर!

व्हायरल व्हिडीओवर भाजप नेत्याने काय म्हटलं?

भाजप नेते अमर किशोरने म्हटलं, ती महिला आमच्या पार्टीची सक्रिय सदस्य आहे. तब्येत बिघडल्याने तिने मला फोन केला होता. मला आराम करायचा आहे. मला राहण्यासाठी थोडी जागा द्या. तेव्हा मी त्या महिलेला पिकअप करून कार्यालयात घेऊन आलो. आम्हाला वाटलं घरी जाणं उचित ठरणार नाही.

तिला चक्कर आल्याने ती खाली पडणार होती. पण मी तिचा हात धरला आणि तिला खाली पडण्यापासून वाचवलं. तिनेही माझा हात पकडला. आम्ही आमच्या कार्यकर्त्याची मदत नाही करायची मग कोणाची मदत करायची..कार्यकर्त्याची मदत करणं गुन्हा असेल तर मग याबाबत काही बोलू शकत नाही. हा व्हिडीओ आमच्या कर्मचाऱ्याने व्हायरल केला आहे. महिला आता ठीक आहे. तिची तब्येत ठीक आहे. 

हे ही वाचा >>पुण्यात खळबळ! आईसह पोटच्या लेकरांची केली निर्घृण हत्या! नंतर पेट्रोल टाकून जाळलं, पण नंतर...

    follow whatsapp