मोठी बातमी: मुंबईकरांना रेड अलर्ट, शाळा-कॉलेजच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय

साहिल जोशी

• 04:27 PM • 26 Jul 2023

मुंबईत पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे मुंबई महापालिकेने उद्या (27 जुलै) शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

very heavy rain in mumbai in next 24 hours mumbai municipal corporation bmc announced holiday schools colleges mumbai news in marathi

very heavy rain in mumbai in next 24 hours mumbai municipal corporation bmc announced holiday schools colleges mumbai news in marathi

follow google news

Updated news in Marathi मुंबई: मुंबईत (Mumbai) आज (26 जुलै) दुपारपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. तसंच पुढील 24 तासात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) आता शाळा-महाविद्यालयांना सुट्टी (School-College Holiday) जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरात मागील आठवड्यापासून पावसाचा जोरदार बॅटिंग सुरू आहे. उद्या देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने आता सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. (very heavy rain in mumbai in next 24 hours mumbai municipal corporation bmc announced holiday schools colleges mumbai news in marathi)

हे वाचलं का?

अति मुसळधार पावसाचा इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

भारतीय हवामान खात्याच्या (मुंबई) वतीने, मुंबई महानगराला आज (26 जुलै) रात्री 8 ते उद्या (27 जुलै) दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुटी जाहीर केली आहे.

हे ही वाचा>> No Confidence Motion : पराभव निश्चित… तरीही मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव का?

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी

मुंबईतील बोरिवली पूर्व स्थानकासमोर संततधार पावसामुळे पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे येथील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी साचले आहे. यासोबतच बोरीवली पूर्व एसव्ही रोडवरही पाणी साचले आहे.

अजित पवारांनी घेतला राज्यातील परिस्थितीचा आढावा

राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, अवर्षण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी . मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मंत्रालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा प्रशासनाकडून नेमका अंदाज घेतला.

हे ही वाचा>> Vijay Darda यांचे हात कोळसा घोटाळ्यात काळे, दर्डा पिता-पुत्राला ‘इतकी’ वर्ष काढावी लागणार तुरुंगात

या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सैनिक, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, प्रधान सचिव असीम गुप्ता, आमदार संजय कुटे, मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

    follow whatsapp