सोलापूर : गाणगापूर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस–डंपरच्या धडकेत दोघांचा चिरडून दुर्दैवी अंत

Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एसटी बस आणि डंपरच्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली. अपघातादरम्यान डंपरला भीषण आग लागल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अग्निशमन दलाला माहिती दिली असता, अग्निशमन दल आले आणि त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Solapur accident

Solapur accident

मुंबई तक

04 May 2026 (अपडेटेड: 04 May 2026, 06:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

डंबर एसटी बसची धडक अन् दोघांचा भीषण अपघात 

point

अपघातादरम्यान डंपरला भीषण आग

Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एसटी बस आणि डंपरच्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली. समोरून आलेला डंपर हा मुरूमाने भरलेला होता, या अपघातात काही लोक ठार झाल्याची माहिती समोर आली. या अपघातामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचं देशात सर्वात मोठं लीड, अजितदादांसह भाजपच्या 2 आमदारांचा विक्रम मोडला

डंबर एसटी बसची धडक अन् दोघांचा दुर्दैवी मृत्यू

डंबर एसटी बसची धडक इतकी भीषण होती की, एसटी बसचा पुढील भाग मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर डंपरने पेट घेतला आणि परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे. बसमधील अनेक प्रवासी गंभीरपणे जखमी झाले असता, काहींना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळपणे मदतीचे काम सुरु करण्यात आले, तसेच जखमींना बाहेर काढण्यात आले होते. 

या अपघातात जखमींना तातडीने अक्कलकोटच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले आणि या अपघाताचा तपास केला. अशातच या झालेल्या दुर्घटनेनं महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

हे ही वाचा : '..त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे' भाजपचा मुंबईत विजयी जल्लोष; काय म्हणाले फडणवीस?

अपघातादरम्यान डंपरला भीषण आग 

अपघातादरम्यान डंपरला भीषण आग लागल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अग्निशमन दलाला माहिती दिली असता, अग्निशमन दल आले आणि त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.