मुंबईची खबर : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा शेवटचा टप्पा पूर्ण, कधी होणार सुरु?

मुंबईतील वाहतूक कोंडी करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकल्पांना गती दिली जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) फेज-२. अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पाचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा 'एमएमआरडीए'ने यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 04:51 PM • 02 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान

point

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा शेवटचा टप्पा पूर्ण

point

कधी होणार सुरु?

Mumbai News : मुंबईतील वाहतूक कोंडी करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकल्पांना गती दिली जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) फेज-२. अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या प्रकल्पाचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा 'एमएमआरडीए'ने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. वाकोला नाला पुलावर 54 मीटर लांबीचे दोन कंपोझिट गर्डर बसवून बीकेसी आणि वाकोला दरम्यानचा शेवटचा दुवा आता जोडला गेला आहे. या यशस्वी कामामुळे एकूण 10.88 किमी लांबीचा हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांचा पूर्व-पश्चिम प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

हे वाचलं का?

तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प

हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता, कारण वाकोला नाल्यावरील ज्या भागात हे काम सुरू होते, तिथे पारंपारिक आधार प्रणाली वापरणे शक्य नव्हते. नागरी वस्ती आणि भौगोलिक मर्यादांमुळे या ठिकाणी गर्डर लाँच करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, विविध टप्प्यांत विखुरलेले हे उन्नत मार्ग आता एका सलग संरचनेत जोडले गेल्यामुळे जवळपास 11 किमी लांबीचा हा मार्ग आता पूर्णपणे सिग्नलमुक्त झाला आहे. यामुळे पूर्व उपनगरातील चेंबूर आणि पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ दरम्यानचा अडथळा दूर झाला आहे.

हे ही वाचा : 'आमची हाय लागल्याशिवाय राहणार नाही...', शिंदे गटात गेलेल्या बच्चू कडूंवर कार्यकर्त्या तुफान चिडला.. नको नको ते बोलला!

वाहतूक सुरळीत होण्यास मदत

या नवीन पुलाच्या पूर्णत्वामुळे मुंबईतील महत्त्वाची निवासी संकुले, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. हा पूर्ण झाल्यामुळे विविध पुलांचे आणि मार्गांचे जाळे एकमेकांशी जोडले गेले आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहनांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी आता विभागली जाईल आणि विविध मार्गांवरून वाहतूक सुरळीतपणे होण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल.

हे ही वाचा : 'गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही..सहन करायचं..' भोर अत्याचार प्रकरणावरुन सुषमा अंधारे संतापल्या

विनाअडथळा कनेक्टिव्हिटी

SCLR फेज-२ च्या सर्व मार्गांच्या बांधकामानंतर, आता पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH) आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) दरम्यान थेट आणि विनाअडथळा कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), सांताक्रूझ, वाकोला, कलिना, कुर्ला आणि चेंबूर यांसारख्या प्रमुख व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांना या 10.88 किमीच्या कॉरिडॉरने एकत्र आणले आहे. यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रवासाचा दर्जा सुधारून आर्थिक केंद्रांना नवी गती मिळेल असं बोललं जात आहे.