Emergency Alert: तुमच्याही फोनमध्ये अचानक वाजू लागला सायरन? लोकं घाबरून पाहू लागले एकमेकांकडे!

Emergency Alert Phone: भारतातील बहुतेक स्मार्टफोन शनिवारी सकाळी ११:४२ च्या सुमारास अचानक वाजू लागले. आवाजासोबत एक संदेश दिसला, जो एका सरकारी संस्थेने पाठवला होता. हा संदेश एका चाचणी कार्यक्रमाचा भाग होता.

emergency alert in phone did your phone suddenly ring government sent everyone this message

Emergency Alert

मुंबई तक

• 12:59 PM • 02 May 2026

follow google news

मुंबई: भारतातील बहुतेक स्मार्टफोन आज (2 एप्रिल) सकाळी 11:42 च्या सुमारास अचानक सायरनप्रमाणे एकाच वेळी वाजू लागले. अचानक एसओएस (SOS) चा आवाज आला आणि एक संदेश (Emergency Message)दिसला. हा सायरन आणि इमर्जन्सी मेसेज पाहून अनेक लोकांना आश्चर्य आणि काहीशी भीतीही वाटली.

हे वाचलं का?

तो मेसेज नेमका काय?

हा मेसेज सुरुवातील इंग्रजीमध्ये आणि दाक्षिणात्य भाषेत दिसला. नंतर पुन्हा थोड्या वेळाने तशाच पद्धतीचा सायरन वाजला. पण यावेळी तो मेसेज इंग्रजी आणि मराठीमध्ये मोबाइलवर आला होता. या मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सेवा सुरू केली आहे.

तात्काळ आपत्कालीन सूचना देण्यासाठी स्वदेशी 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टम'ची चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान, मोबाइल फोनवर हे मेसेज इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये प्राप्त झाले. संदेश प्राप्त करणाऱ्यांना चाचणीदरम्यान कोणतीही कृती न करण्याची विनंती देखील करण्यात आली होती.

अनेकांमध्ये पसरली घबराट

एकाच वेळी सगळ्यांचे मोबाइल फोनमधील सायरन वाजू लागल्याने अनेक गर्दीच्या ठिकाणी लोकांमध्ये काहीशी घबराट पाहायला मिळाली. लोकल ट्रेन, बाजार आणि रहदारीची ठिकाणी येथे अनेक जण या सायरनने चलबिचल झाले. पण काही वेळातच हा टेस्टिंग मेसेज असल्याचं समजल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

DoT ची पोस्ट

दूरसंचार विभाग (DoT), संचार मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या सहकार्याने देशभरात मोबाइल-आधारित आपत्ती संपर्क प्रणाली मजबूत करत आहे. या प्रणालीचा उद्देश नागरिकांना वेळेवर महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.

दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT)ने विकसित केलेली सूचना प्रणाली (SACHET)NDMA ने यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून या प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. या सूचना प्रणालीने नैसर्गिक आपत्ती, हवामानाचे इशारे आणि चक्रीवादळांच्या वेळी 19 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 134 अब्जाहून अधिक एसएमएस सूचना पाठवल्या आहेत.

सेल ब्रॉडकास्ट-आधारित सार्वजनिक आपत्कालीन सूचना प्रणाली स्वदेशी पद्धतीने विकसित करण्याची आणि कार्यान्वित करण्याची जबाबदारी C-DOT वर सोपवण्यात आली आहे.

इस्रायलदेखील करते या प्रणालीचा वापर

इस्रायल आपल्या नागरिकांना क्षेपणास्त्र, ड्रोन किंवा रॉकेट हल्ल्याची सूचना पाठवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे त्यांना वेळेवर बंकरमध्ये आश्रय घेता येतो.

मोबाइल यूजर्स त्यांच्या इच्छेनुसार हे चालू किंवा बंद करू शकतात. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर जा आणि Safety & Emergency → Wireless Emergency Alerts → Test Alerts निवडा.