HSC RESULT 2026 : बारावीच्या निकालाविषयी HSC बोर्डाने माहिती दिली आहे. आज (2 मे) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विभागनिहाय निकालाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. नऊ विभागीय मंडळांसाठी एकूण १४, ३३, ०५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२, ८६, ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दोन टक्के कमी निकाल लागला आहे. गेल्या वर्षी ९१.८८ टक्के इतका निकाल लागला होता.
ADVERTISEMENT
कोकण विभाग अव्वल
यामध्ये सगळ्यात टॉपवर राहिला आहे कोकण विभाग. कोकण विभागाचा ९४.१४ टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागला आहे. या विभागाचा ८४.१४ टक्के इतका निकाल लागला आहे.
हे ही वाचा : Maharashtra HSC Result 2026: ‘MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, दुर्लक्ष नका करू!
यंदाही मुलींची बाजी
मुलींनी यंदाही बाजी मारली असून परीक्षा दिलेल्या एकूण मुलींपैकी ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर परीक्षा दिलेल्या एकूण मुलांपैकी ८६.८० टक्के इतकी मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
हे ही वाचा : Maharashtra HSC Result 2026: 12वीचा निकाल mahresults.nic.in वेबसाइट आणि मोबाइलवर नेमका पाहायचा कसा?
'असा' आहे विभागनिहाय निकाल
१. कोकण विभाग : ९४.१४ टक्के
२. पुणे विभाग : ९१.२५ टक्के
३. अमरावती विभाग : ९०.९२ टक्के
४. नाशिक विभाग : ९०.७२ टक्के
५. मुंबई विभाग : ९०.०८ टक्के
६. कोल्हापूर विभाग : ८९.९७ टक्के
७. छत्रपती संभाजीनगर विभाग : ८८.६८ टक्के
८. नागपूर विभाग : ८८.६७ टक्के
९. लातूर विभाग : ८४.१४ टक्के
ADVERTISEMENT











