Pune Crime : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर नावाच्या गावात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
आधी अत्याचार अन् नंतर खून
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दगडाने ठेचून तिचा खून केला आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली.
हे ही वाचा : मिसिंग लिंकवर वाहतूक नियम मोडला तर.., फडणवीसांचा इशारा, पण 'त्या' लोकांची मागितली माफी
सुट्टीला आली होती आजीकडे
यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती. संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
हे ही वाचा : मिसिंग लिंकला किती कोटींचा खर्च आला? त्याला नाव काय देणार? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले...
आरोपीला ताब्यात देण्याची गावकऱ्यांची मागणी
या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत मृतदेह घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी गोठ्यासमोरच ठिय्या मांडलाय. पोलीस प्रशासन गावकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. मात्र गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.
ADVERTISEMENT











